Thursday, September 24, 2026
Homeभंडाराविनयभंगाचा गुन्हा दाखल झालेल्या पोलिस उपविभागीय अधिकाऱ्याला मिळाला जामीन..-भंडारा जिल्ह्यातील प्रकरण..

विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेल्या पोलिस उपविभागीय अधिकाऱ्याला मिळाला जामीन..-भंडारा जिल्ह्यातील प्रकरण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

भंडारा :- आपल्या वर्दीचा गैरफायदा घेत न्याय मागण्यासाठी आलेल्या तरुणीकडे भंडाऱ्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.अशोक बागुल यांनी शरीरसुखाची मागणी केली होती.या घटनेनंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु, या घटनेनंतर अवघ्या काही तासात त्यांना जामीन मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सध्या डॉ. अशोक बागुल वैद्यकीय रजेवर असून त्यांचा प्रभार तुमसरचे उपविभागीय पोलिस अधिकारी रश्मिता राव यांना देण्यात आला आहे.भंडारा पोलिस विभागाने डॉ. बागुल यांचा अहवाल नागपूर पोलिस महानिरीक्षकांना पाठविला असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केव्हा होते, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे.

हे गंभीर प्रकरण उजेडात आल्यानंतर सर्वत्र जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. डॉ. बागुल यांना तात्काळ निलंबित करुन बडतर्फ करण्याचीही मागणी लोकांकडून होऊ लागली आहे. सध्या या घटनेचा तपास पवनीचे उपविभागीय पोलिस अधिकारी मनोज सिडाम करीत आहेत. तथापि, डॉ. बागुल यांना जामीन मिळाला असला तरी तो रद्द करण्यासाठी आपण न्यायालयात जाणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते परमानंद मेश्राम यांनी दिली. जर अशा पध्दतीने जनतेचे रक्षक जनतेचेच भक्षक झाले तर जनतेनी आपल्यावर झालेल्या अन्यायाची दाद कुणाकडे मागायची? असे अनेक प्रश्न देखील जनतेपुढे निर्माण झाले आहेत. अशा जनतेचे भक्षण करणाऱ्या अधिकाऱ्याविरोधात कठोर कारवाई करुन सेवेतून तडकाफडकी बडतर्फ करावे, अशा आशयाचे निवेदन भंडारा शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा पोलिस अधिक्षक लोहित मतानी यांना दिले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

निर्धारित ध्वनी मर्यादेचे उल्लंघन; डीजे मालक व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल.. – डीजे सह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम  सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा पवनपार येथील नवयुवक बाल गणेश मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत शासनाने प्रतिबंधित केलेल्या प्रेशर मिड(Pressure...

डुंबरसात्या आणण्यासाठी जंगल परिसरात गेलेल्या इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गावालगतच्या जंगल परिसरात 'डुंबरसात्या' म्हणजेच मशरूम आणण्यासाठी गेलेल्या एका ४५ वर्षीय इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना आज,गुरुवार २४ सप्टेंबर रोजी...

कुरुड,कोंढाळा,सावंगी व विसोरा गावातील रिक्त कोतवाल पद भरण्यास शासनाची मान्यता.. – महिला आरक्षण व रिक्त पदे भरण्याकरिता जातीचा प्रवर्ग निश्चित करण्यासाठी विशेष सभा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील कुरुड,कोंढाळा,सावंगी व विसोरा गावातील गेल्या अनेक कालावधीपासून रिक्त असलेले कोतवाल(महसुल सेवक)पद भरण्यास शासनाने मान्यता दिली असून संबंधित गावातील...

कृषी विभागातील तब्बल १४ हजार ४४५ तांत्रिक अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून दुष्काळग्रस्तांना एक दिवसांचे वेतन..

उद्रेक न्युज वृत्त :-निसर्गाच्या लहरीपणाचा नेहमीच शेतकरी बांधवांना फटका सहन करावा लागतो आहे. कधी अवकाळी पाऊस,तर कधी किडीचा प्रादुर्भाव,तर कधी ऐन हंगामात धो-धो पावसामुळे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!