Monday, August 31, 2026
Homeचंद्रपूरविद्यार्थिनींना मारहाण प्रकरणी शिक्षिकेवर कारवाईची मागणी... - माझ्या बाटलला हात का लावले?...

विद्यार्थिनींना मारहाण प्रकरणी शिक्षिकेवर कारवाईची मागणी… – माझ्या बाटलला हात का लावले? पिण्याच्या पाण्यामध्ये काही टाकले का? म्हणीत विद्यार्थिनींना मारहाण…

- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील इयत्ता सातव्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थिनींना सहाय्यक शिक्षिकेने मारहाण केल्याची घटना काल, शनिवारी २८ सप्टेंबर रोजी घडली.लावण्या कुमदेव चुधरी व धनश्री हरीदास दहेलकार असे मारहाण झालेल्या विद्यार्थिनींची नावे आहेत.मारहाण झाल्यानंतर दोघींनाही उपचारासाठी सावलीचे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सावली तालुक्याच्या व्याहाड खुर्द येथे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी शाळेच्या वेळेवर गेले होते.प्रार्थनेनंतर विद्यार्थी वर्ग खोल्यामध्ये गेले असता,वर्गातील सहाय्यक शिक्षिका उज्ज्वला पाटील यांनी सातव्या वर्गातील विद्यार्थ्यांना बोलावून माझ्या बाटलला हात का लावले? पिण्याच्या पाण्यामध्ये काही टाकले का? अशी शंका व्यक्त करीत वर्गातील विद्यार्थ्यांना मारहाण केली.त्यात लावण्या व धनश्री यांना दुखापत झाल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले.दोन्ही विद्यार्थिनी शाळेत हुशार असून शालेय मंत्रिमंडळात लावण्या ही मुख्यमंत्री तर धनश्री ही शिक्षणमंत्री आहे.शिक्षिका ही नेहमीच विद्यार्थ्यांना मारहाण करीत असल्याचा आरोप विद्यार्थीनींकडून करण्यात आला आहे.या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून संबंधित शिक्षिकेवर कारवाई करण्याची मागणी पालकवर्गाकडून केल्या जात आहे.
मधुकर वासनिक,गटविकास अधिकारी पंचायत समिती सावली👇
या प्रकरणाबाबत शिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली असून प्रकरणाची चौकशी करुन संबंधित शिक्षिकेवर कारवाई करण्यात येईल.विद्यार्थ्यांनी मनात कोणतीही भीती न बाळगता नियमित शाळेत जावे.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज आमदार मसराम यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा देसाईगंज उपविभागीय कार्यालयावर धडकला महामोर्चा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी,कष्टकरी,आदिवासी,निराधार व बेरोजगारी,महागाईने तसेच स्मार्ट मिटरने त्रस्त नागरीकांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज,सोमवार ३१ ऑगस्ट रोजी आरमोरी विधानसभा...

जंगली हत्तींच्या हैदोसाने शेतकरी त्रस्त..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या आरमोरी तालुक्यातील विविध परिसरात सलग तीन दिवसांपासून जंगली हत्तींनी शेतशिवारातील धानपिकात धुमाकूळ घालून मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने जंगली हत्तींच्या हैदोसाने...

वाघाच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील मोहर्ली वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मोहर्ली वनपरिक्षेत्राच्या मोहर्ली बिटातील १५४ कक्ष क्रमांकात...

ई-पीक पाहणी नोंद घेणाऱ्यांकडून पैश्याची मागणी; तहसील कार्यालयात करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत बदल करून गावनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या पीक पाहणी सहाय्यकांमार्फत पिकांची नोंद करण्यात येत आहे.विशेष म्हणजे,शासकीय योजना,पीक कर्ज...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!