Monday, August 31, 2026
Homeगडचिरोलीमूलचेरा तालुक्यातील उदयनगर बांग्ला प्राथमिक शाळा शिक्षण मंत्र्यांकडून सन्मानित.. -परसबाग निर्मितीमध्ये राज्यात...

मूलचेरा तालुक्यातील उदयनगर बांग्ला प्राथमिक शाळा शिक्षण मंत्र्यांकडून सन्मानित.. -परसबाग निर्मितीमध्ये राज्यात प्रथम क्रमांक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-परसबाग निर्मिती मध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल मूलचेरा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उदयनगर बांग्ला यांना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते आज,२९ सप्टेंबरला पूणे येथे आयोजित कार्यक्रमात प्रथम पुरस्काराने गौरविण्यात आले.सदर पुरस्कार मुख्याध्यापक दीपक मंडल, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अजय सरकार,शालेय पोषण आहारचे अधीक्षक बारेकर यांनी स्विकारला. जिल्हाधिकारी संजय दैने व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी शाळा व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापक यांना शाळेचे व गडचिरोली जिल्ह्याचे नाव संपूर्ण राज्यात उज्ज्वल केल्याबद्दल अभिनंदन व शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात राज्यातील सर्व शाळांमधून परसबाग उपक्रमास प्रोत्साहन देण्याकरीता घेण्यात आलेल्या परसबाग स्पर्धेत गडचिरोली जिल्ह्याच्या मुलचेरा तालुक्यातील उदयनगर बांग्ला जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परसबागेला राज्यातून प्रथम क्रमांक मिळाला आहे. शालेय परसबाग स्पर्धेकरिता तालुकास्तरावरील परसबागांचे मूल्यांकन करण्यात येऊन प्रत्येक जिल्ह्यांतून एक परसबाग राज्यस्तरीय मूल्यांकनास पात्र ठरलेली होती.अशा सर्व जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाच्या परसबागेचे परिक्षण पूर्ण करण्यात येवून निर्धारित निकषांच्या आधारे राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय-दोन,तृतीय आणि प्रोत्साहनपर तीन अशा शाळांची निवड करण्यात आली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शासकीय आदिवासी वसतिगृहांच्या खासगीकरणाचे आरोप तथ्यहीन.. – राज्यातील ४९० शासकीय वसतिगृहांतील विद्यार्थ्यांसाठी १८ प्रकारचे उपक्रम मोफत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासी विकास विभागाच्या शासकीय विद्यार्थी वसतिगृहांचे खासगीकरण करण्यात येत असल्याचे किंवा वसतिगृहांचे व्यवस्थापन खासगी संस्थेकडे सोपविण्यात आल्याचे आरोप तथ्यहीन आहेत. वसतिगृहांची...

आज आमदार मसराम यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा देसाईगंज उपविभागीय कार्यालयावर धडकला महामोर्चा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी,कष्टकरी,आदिवासी,निराधार व बेरोजगारी,महागाईने तसेच स्मार्ट मिटरने त्रस्त नागरीकांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज,सोमवार ३१ ऑगस्ट रोजी आरमोरी विधानसभा...

जंगली हत्तींच्या हैदोसाने शेतकरी त्रस्त..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या आरमोरी तालुक्यातील विविध परिसरात सलग तीन दिवसांपासून जंगली हत्तींनी शेतशिवारातील धानपिकात धुमाकूळ घालून मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने जंगली हत्तींच्या हैदोसाने...

वाघाच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील मोहर्ली वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मोहर्ली वनपरिक्षेत्राच्या मोहर्ली बिटातील १५४ कक्ष क्रमांकात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!