Monday, July 13, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआनंदाची बातमी... मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास...

आनंदाची बातमी… मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास झाली सुरुवात.. – २६ सप्टेंबर रोजी ३८ लाख ९८ हजार ७०५ बहिणींना मिळाला लाभ…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे.२९ सप्टेंबरपासून तिसऱ्या टप्प्यातील पैसे महिलांना मिळतील अशी माहिती राज्य सरकारने दिली होती.त्यानुसार आता महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जात आहेत.याबाबत महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी अधिकृतपणे माहिती दिली आहे.
आदिती तटकरे यांनी आपल्या एक्स खात्यावर तिसऱ्या टप्प्याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाच्या तिसऱ्या टप्प्यास सुरुवात झाली असून दिनांक-२६ सप्टेंबर रोजी ३८ लाख ९८ हजार ७०५ बहिणींना ५८४.८ कोटी रुपयांचा लाभ हस्तांतरीत करण्यात आला आहे.उर्वरित बहिणींना लाभ हस्तांतरणाची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे.सर्व पात्र महिलांना महिन्या अखेरपर्यंत लाभ मिळणार आहे.ज्या महिलांना आधी लाभ मिळाला होता; त्यांना तीसरा हप्ता आणि ज्यांना आधी तांत्रिक अडचणींमुळे लाभ मिळाला नव्हता,त्यांना यावेळेस तिन्ही हफ्ते एकत्र देण्यात आले आहेत; असे आदिती कटकरे यांनी म्हटले आहे.
ऑगस्ट महिन्यात पात्र महिलांच्या बँक खात्यात सरकारने एकदाच दोन महिन्यांचे ३ हजार रुपये पाठवले आहेत.मात्र,अर्जात त्रुटी असल्यामुळे अनेक महिलांना हे पैसे मिळालेले नाहीत.ज्या महिलांनी आपल्या अर्जातील त्रुटी दूर केलेली आहे; अशा महिलांना तीन हप्त्याचे एकूण ४५०० रुपये दिले जातील.तर १ सप्टेंबरपासून अर्ज केलेल्या महिलांना फक्त एकाच महिन्याचे म्हणजेच सप्टेंबर महिन्याचे १५०० रुपये मिळणार आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!