Friday, May 1, 2026
Homeचंद्रपूरवाघांच्या शिकारीसाठी कुख्यात बहेलिया टोळीचा म्होरक्या अटकेत.. - विदर्भातील १९ वाघांची शिकार...

वाघांच्या शिकारीसाठी कुख्यात बहेलिया टोळीचा म्होरक्या अटकेत.. – विदर्भातील १९ वाघांची शिकार केल्याचा आरोप..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-वाघाची वा इतर प्राण्यांची शिकार करणे  वन्यजीव संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा आहे.वाघाची कातडी तसेच इतर अवयवांची परदेशात मोठी मागणी असल्याने शिकार करणारे टोळ्या तयार करून वाघाची शिकार करीत असतात.अशातच वाघांच्या शिकारीसाठी कुख्यात असणाऱ्या बहेलिया टोळीचा म्होरक्या अजित राजगोंड याला आज,सोमवार २७ जानेवारीला चंद्रपूर जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातून अटक करण्यात आली आहे.बेहेलिया टोळीवर २०१३ ते २०१५ या कालावधीत विदर्भातील जवळपास १९ वाघांची शिकार केल्याचा आरोप आहे.बहेलिया टोळी ही मध्य प्रदेशातील आहे.अजित राजगोंड हा टोळीचा म्होरक्या आहे.बहेलिया टोळीने २०१३ ते २०१५ मध्ये विदर्भातील जवळपास १९ वाघांची शिकार केल्याचा संशय वनविभाग व पोलिसांनी व्यक्त केला आहे.या शिकारीमागे अजित व त्याचे दोन भाऊ केरू व कुट्टू यांचा हात असल्याने अजित राजगोंड याची अटक एक मोठी कारवाई असल्याचे मानले जात आहे.विशेष म्हणजे,वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोने २०१५ मध्ये तिरुपती येथून अजित राजगोंड याला अटक केली होती.त्यानंतर सीबीआय अर्थात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने या प्रकरणाचा तपास करून अजितला शिक्षाही ठोठावली होती.त्यानंतर सप्टेंबर २०२४ मध्ये तो जामिनावर तुरुंगाबाहेर आला होता.पण आता त्याच्यासारखा कुख्यात तस्कर अचानक राजुरा तालुक्यात सापडल्यामुळे वनविभागाची चिंता वाढली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चक्क चोरट्यांनी खासदारांच्या शेतातील वीज मीटरसह मोटरपंप नेला चोरून.

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात चोरीच्या घटनांनी जोर धरलेला असतांनाच आता थेट लोकप्रतिनिधीही यातून सुटलेले नाहीत.भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांच्या वडिलोपार्जित शेतातून अज्ञात...

तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; चंद्रपूर पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे आता आयुष नोपानी यांच्याकडे..

उद्रेक न्युज वृत्त :-ऐन महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्यातील तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या(भारतीय पोलीस सेवा)बदल्या करण्यात आल्या आहेत.यात चंद्रपूरचे विद्यमान...

“आपण लोकांची कामे करण्यासाठी बसलो आहोत; अडवणूक करण्यासाठी नाही”.. -सहपालकमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण मॅपिंग करून शासनाने स्वतः त्यांच्या दारात जाऊन गरजेनुसार योजनांचा लाभ द्यावा,अशी भूमिका कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष...

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!