- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-ऐन प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच एका कुटुंबावर काळाचा घाला झाल्याची बातमी समोर आली आहे.गोंदिया जिल्ह्याच्या नवेगावबांधकडे फिरायला जाणाऱ्या दुचाकी वाहनास भरधाव पिकअपने मागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीवर स्वार असलेली पत्नी,चिमुकला व शेजारील चिमुकल्या मुलीचा जागीच मृत्यू झाला तर चालक गंभीर जखमी झाल्याची घटना काल,रविवार २६ जानेवारीच्या दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास बाराभाटी मार्गावरील भारती बारसमोर घडली.अपघातात दुचाकी चालक संदिप राजू पंधरे वय २९ वर्षे गंभीर जखमी असून त्याला ब्रम्हपुरी येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.चितेश्वरी संदिप पंधरे वय २५ वर्षे,मुलगा संचित संदिप पंधरे वय ५ महिने घराशेजारील पार्थवी रोहीत सिडाम वय ३ वर्षे अशी मृतांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार,अर्जुनी मोरगाव तालुक्यातील येरंडी येथील संदिप राजू पंधरे वय २९ वर्षे हा तरूण मोटारसायकल क्रमांक-एम.एच.३५ ए एम २७५६ वरून पत्नी चितेश्वरी,मुलगा संचित व घराशेजारील मुलगी पार्थवी यांच्यासह नवेगावबांधकडे निघाले होते. बाराभाटी-नवेगावबांध मार्गावरील भारती बारजवळ पाठिमागून भरधाव येणाऱ्या पिकअपने त्यांच्या मोटरसायकलला जोराची धडक दिली.धडक बसताच अपघातात चितेश्वरी,संचित व पार्थवी या तिघांचा जागीच मृत्यू झाला तर संदिप गंभीर जखमी झाला.घटनेची माहिती मिळताच नवेगावबांध पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी संदिपला ब्रम्हपुरी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.रुग्णालयात नातेवाईकांसह येरंडी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने येरंडी गावात शोककळा पसरली आहे.
- Advertisement -

