Monday, August 24, 2026
Homeचंद्रपूरवडिलांनी विकत घेतले घर; मुलगा, सुनेने केला छळ...न्यायालयाने दिला दणका; दर महिना...

वडिलांनी विकत घेतले घर; मुलगा, सुनेने केला छळ…न्यायालयाने दिला दणका; दर महिना चार हजार रुपये आई-वडिलांना देण्याचे दिले आदेश…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

चंद्रपूर(बल्लारपूर) :- बल्लारपूर येथील दीनदयाल वॉर्डातील रहिवासी जानकीदेवी लक्ष्मण मांझी यांच्या याचिकेवर ३१ ऑगस्टला बल्लारपूर न्यायालयाने सुनावणी केली. त्यांची सून व मुलाला वडिलांचे राहते घर खाली करून दर महिना चार हजार रुपये आई- वडिलांना देण्याचे आदेश दिले आहेत.

बल्लारपूर पेपर मिलमधून सेवानिवृत्त झाल्यानंतर लक्ष्मण मांझी यांनी पंडित दीनदयाळ वॉर्डात घर विकत घेतले व पत्नी तसेच आपला मुलगा आणि सुनेसह राहू लागले; परंतु, काही दिवसानंतर मुलगा व सुनेने त्यांना मानसिक व शारीरिक त्रास देणे सुरू केले.हा त्रास असहनीय झल्यानंतर जानकीदेवी मांझी यांनी महिला अधिनियमचे कलम १९ चे अंतर्गत ॲड. सुनील पुरी यांच्या माध्यमातून मुलगा जितेंद्र मांझी व सून मीना मांझी यांच्या विरोधात बल्लारपूर न्यायालयात याचिका दाखल केली.न्यायाधीश अनुपम एस.शर्मा यांनी निर्णय देताना मुलगा व सुनेला दोन महिन्यांच्या आत घर खाली करण्याचा आदेश दिला व मांझीचा मुलगा जितेंद्र याला दर महिना चार हजार गुजराण भत्ता देण्याचे आदेश दिले.मुलगा व सून यांना त्यांच्या घरी न जाण्याचे आदेश दिले.वयोवृद्ध जानकीदेवी यांची पैरवी ॲड.सुनील पुरी यांनी केली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ढोल-ताशा वादनाचा नवा विश्वविक्रम..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  उपस्थितीत आज,रविवार २३ ऑगस्ट रोजी नागपूरच्या रेशिमबाग मैदान येथील आयोजित 'मंथन फॉर युवा' (जेनझी संवाद)कार्यक्रमात ढोल-ताशा...

आज गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे दोन मार्ग बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात दोन दिवसांपासून अधून-मधून पावसाची संततधार सुरू आहे.पावसामुळे काही ठिकाणची नाले पाण्याने भरभरून वाहू लागले आहेत. अश्यातच काही नाल्यांवरील पुल ठेंगणे...

शेतावर गेला ‘तो’ घरी परतलाच नाही; आज सापडला मृतदेह.. – कोंढाळा येथील घटना..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-शेतावर धानपिकाला खत मारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा दुसऱ्या दिवशी चक्क मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.सदरची घटना ही देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा...

देसाईगंज ठाणेदारांची सट्टा-पट्टी व्यवसायावर धाड; ११ जण गजाआड.. – दुचाकी वाहनांसह साहित्य नेले उचलून..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहरातील मुख्य बाजारपेठेसह तालुक्यातील विविध गावात सट्टा-पट्टी व्यवसायाला मोठे उधाण आल्याची बाब उघडकीस येताच नव्याने रुजु झालेले देसाईगंज पोलीस ठाण्याचे ठाणेदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!