Saturday, August 29, 2026
Homeचंद्रपूरवकिलाने राहत्या घरीच घेतला गळफास; बारा दिवसांत दोन वकिलांच्या आत्महत्या..

वकिलाने राहत्या घरीच घेतला गळफास; बारा दिवसांत दोन वकिलांच्या आत्महत्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा शहरातील एका ४० वर्षीय वकिलाने स्वतःच्या राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.अवघ्या बारा दिवसांच्या अंतराने दुसरी आत्महत्येची आणि तेही वकिली पेशातील इसमांनीच आत्महत्या केली आहे.ॲड.नितीन वासाडे वय ४० वर्षे, रा.जवाहरनगर,राजुरा असे आत्महत्या केलेल्या वकिलाचे नाव असून ते भाजपचे राजुरा शहर उपाध्यक्ष होते. सदरची घटना ही काल रविवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली.नितीन यांनी १५ दिवसांपूर्वीच आपल्या घराचे नूतनीकरण करून कार्यक्रम केला होता.नेमकी कोणत्या कारणांनी नितीन यांनी आत्महत्या केली,याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.राजुरा शहरातील एवढ्यातील गळफास घेऊन आत्महत्या केल्याची ही दहावी घटना आहे,तर शहरातील बारा दिवसातील ही दुसऱ्या वकिलाची आत्महत्या आहे.यापूर्वी २४ फेब्रुवारी रोजी ॲड.अमित जयपूरकर यांनी घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली होती.मृतक वासाडे हे पत्नी व १२ वर्षाच्या मुलीसह जवाहरनगरात वास्तव्यास होते.पत्नी रेल्वेमध्ये कंत्राटी कर्मचारी असून पत्नी नोकरीवर तर मुलगी शिकवणी वर्गाला गेली होती.पत्नी सायंकाळी घरी परत आली असता पती नितीन हे खोलीत लटकलेल्या अवस्थेत दिसून आले.लागलीच घटनेची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली.पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला.प्रकरणाचा पुढील तपास राजुरा पोलीस प्रशासन करीत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळेत राखी मेकिंग स्पर्धा व रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न.. -विद्यार्थ्यांनी देसाईगंज पोलिस बांधवांना राखी बांधून व्यक्त केली...

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या 'पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनी वडसा' येथे आज,शनिवार २९ ऑगस्ट रोजी 'एक राखी देशाचे...

पोलीस दलात खळबळजनक घटना..! पोलीस उपनिरीक्षकाने धावत्या रेल्वे समोर घेतली उडी; घटनास्थळीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच १६ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क व अर्ज शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय)यांनी शासकीय निवासस्थानी गळफास...

देसाईगंज तालुक्यात रोजगार हमीच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार.. – काम न करताच उचलली लाखो रुपयांची बिले..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यात यंत्रणा स्तरावरून करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये मोठा कथित भ्रष्टाचार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.यात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या...

सर्व अन्न विक्रेते व्यावसायिकांना परवाना घेणे बंधनकारक.. – पाणीपुरी पासून ते चहा विक्रेते व इतर परवाना नसणाऱ्यांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-अन्न व्यावसायिक विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम ३१ अंतर्गत परवाना घेणे किंवा नोंदणी प्रमाणपत्र घेणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!