Sunday, July 26, 2026
Homeनागपूरसोशल मीडियावर ओळख झालेल्या तरुणीवर अत्याचार; आरोपीस बेड्या..

सोशल मीडियावर ओळख झालेल्या तरुणीवर अत्याचार; आरोपीस बेड्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-सोशल मीडियाच्या स्नॅपचॅटवर एका २१ वर्षीय तरुणीची २३ वर्षीय तरुणाशी ओळख झाली.ओळखीचा गैरफायदा घेत तरुणाने शीतपेयात गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केला.त्यानंतर,तिचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपीने तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले.यात तरुणी गर्भवती राहिली.गर्भवती झाल्यानंतर तिचा गर्भपात केला.मानसिकदृष्ट्या खचलेली तरुणी आपल्या राज्यात निघून गेल्यानंतर आरोपीने तिचे अश्लील फोटो तिच्या नातेवाइकांना पाठवून सोशल मीडियावर अपलोड केले. या प्रकारामुळे मानसिक तणावात गेलेल्या तरुणीने नागपूरच्या बेलतरोडी पोलिसांत तक्रार नोंदवताच पोलिसांनी आरोपी तरुणाला बेड्या ठोकल्या असून अभिजीत सुंदरलाल चौधरी वय २३ वर्षे,रा.अजनी, नागपूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.तो एमबीएला शिक्षण घेत आहे,तर पीडित युवती २१ वर्षाची असून,ती अभियंता आहे.ती मूळची मध्य प्रदेशातील रहिवासी असून,मागील दोन वर्षांपासून नागपूरच्या मिहान परिसरातील एका कंपनीत काम करते.तरुणी तिच्या काकू-काकांच्या शेजारीच किरायाच्या खोलीत राहते.आरोपी अभिजीतसोबत युवतीची २०२४ मध्ये स्नॅपचॅटवर ओळख झाली. त्यानंतर,आरोपी अभिजीतचे तरुणीच्या खोलीवर येणे-जाणे सुरू झाले.दरम्यान,आरोपी अभिजीतने तरुणीला शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन जबरदस्ती तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.त्यानंतर,आरोपीने तिचे अश्लील फोटो काढले व अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपीने तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले.यात युवती गर्भवती राहिली.आरोपी अभिजीतने तिला गर्भपात करावयास लावला.या घटनेमुळे खचलेली युवती मध्य प्रदेशात आपल्या आई-वडिलांकडे निघून गेली.त्यानंतरही आरोपी अभिजीतने तिला त्रास देणे सुरूच ठेवले.आरोपीने तरुणीला परत नागपुरात येण्यासाठी दबाव टाकला. नागपूरला न आल्यास तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली आणि तिचे अश्लील फोटो तिच्या नातेवाइकांना पाठवून सोशल मीडियावर अपलोड केले.प्रकरणी तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीस बेड्या ठोकण्यात आल्या.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता तुकाराम मुंढेंचा सौंदर्य प्रसाधनांवर कारवाईचा धडाका..!

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बदल्यांचे सुलतान म्हणवल्या जाणारे तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्तपद स्वीकारताच राज्यभरात भेसळयुक्त अन्नपदार्थ,निकृष्ट दर्जाची औषधे,तसेच प्रतिबंधित तंबाखू,गुटखा...

धक्कादायक..! लहान भावाच्या उपस्थितच १६ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने आपल्या आठ वर्षीय लहान भावाच्या उपस्थितच गळफास लावून...

शेतकरी कर्जमाफी योजना; गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ५३९ शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या शासनाकडून प्राप्त झाल्यानंतर २५ जुलै २०२६ रोजी...

शेतातील सागवानाची ५०० झाडे जळून खाक; विद्युत वितरण कंपनीला ग्राहक आयोगाचा दणका..

उद्रेक न्युज वृत्त :-यवतमाळ जिल्ह्यातील नागरिक आपल्या न्याय हक्काचा लढा नेहमी लढतांना दिसून येतात.ग्राहक तक्रार निवारण आयोगात धाव घेत शेतकरी साहित्यातील त्रुटी असोत वा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!