Saturday, October 17, 2026
Homeचंद्रपूररेती तस्कराची मुजोरी; तलाठ्यास धक्काबुक्की करीत ट्रॅक्टर पळवला..

रेती तस्कराची मुजोरी; तलाठ्यास धक्काबुक्की करीत ट्रॅक्टर पळवला..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :- ‘चोरी तर चोरी वरून शिनाजोरी’ केल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपूर जिल्ह्याच्या भद्रावती तालुक्यात आज,गुरुवारी ३० जानेवारीला उघडकीस आला आहे.अवैध वाळू भरलेला ट्रॅक्टर तलाठ्याने कारवाईसाठी अडविला असता चक्क वाळू तस्कराने धक्काबुक्की करीत ट्रॅक्टर पळविल्याने रेती तस्करांची मुजोरी कायम असल्याचे दिसून येत आहे.याप्रकरणी तहसीलदारांच्या सूचनेनुसार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
माहितीनुसार,भद्रावती तालुक्यातील कारेगाव येथे  अवैध वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती तलाठी गीते यांना मिळाली.त्यांनी कारेगाव येथे जाऊन अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला अडविले.तलाठी कारवाई करीत असतांनाच चक्क तलाठ्याला धक्का देत ट्रॅक्टर चालकाने तलाठी यांच्या समोरूनच ट्रॅक्टर पळवून नेला.घटना घडत असतांना बहुसंख्य नागरिक गोळा होत सदर प्रकाराचा व्हिडिओ काही नागरिकांनी काढून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.सदर घटनेची माहिती भद्रावतीच्या तहसीलदार भांडारकर यांना देण्यात आली.त्यांच्या सूचनेनुसार शेगाव पोलिसांत सदर प्रकाराची तक्रार दाखल करण्यात आली असून रेती तस्करावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विविध शिष्यवृत्तीसाठी एनएसपी व महाडीबीटी पोर्टलवर अर्ज नोंदणीचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मॅट्रिकपूर्व व मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांसाठी सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील अर्ज केंद्र शासनाच्या राष्ट्रीय...

बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून तीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी; १ लाख २० हजार स्वीकारतांना ताब्यात.. -गडचिरोली जिल्ह्यातील स्विकृत नगरसेवकावर गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी नगरपंचायतीतील एका ४० वर्षीय स्विकृत नगरसेवकाने नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कामातील बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून ३ लाख...

प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकतींसाठी मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत(SIR)प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्याची मुदत २६ ऑक्टोंबर २०२६ पर्यंत...

देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू,तिघेजण जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.माहूर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये डोंगरावर वसलेल्या रेणुका मातेच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या टेम्पोचा माहूर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!