Friday, October 16, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तलाडकी बहिण योजनेतील बोगस लाभार्थ्यांची नावे उघड... - तब्बल १,१७१ अर्ज दुसऱ्या...

लाडकी बहिण योजनेतील बोगस लाभार्थ्यांची नावे उघड… – तब्बल १,१७१ अर्ज दुसऱ्या राज्यातील…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील लाडकी बहिण योजनेत एक,दोन नाही तर तब्बल १,१७१ अर्ज दुसऱ्या राज्यातील असल्याचे उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.यात अंगणवाडी सेविका असल्याचे भासवून लॉगिन आयडी तयार करून अर्ज भरण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे.महत्वाचे म्हणजे अर्जदार हे पश्चिम बंगाल आसाम राजस्थान
आणि उत्तर प्रदेशातील असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी आता सोलापूर जिल्ह्यातील बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकट्या बार्शी तालुक्यात २२ बोगस अर्ज आले होते. त्यांना मिळणारे पैसे आता तातडीने थांबवण्यात आले आहेत.बार्शी तालुक्यातील एका गावात मुस्लिम महिलांचे अर्ज सापडले.प्रत्यक्ष गावात एकही मुस्लिम कुटुंब नाही.अधिकाऱ्यांकडून आधारकार्ड क्रमांक, बँक खात्याच्या आधारे तपासणी केल्यानंतर बनावट खाती उत्तर प्रदेश,आसाम,पश्चिम बंगाल, राजस्थानातील असल्याचे उघड झाले.यात लॉगईन आयडीचा गैरवापर झाल्याचे निदर्शनास आले आहे.
बनावट लॉगिन आयडीचा गैरवापर करुन हा घोटाळा करण्यात आला.सरकारी वेबसाईटवर लॉगिन आयडी तयार करण्याची सुविधा दिली होती.एका लॉगईन आयडीवर अनेक अर्ज भरण्याची सोय आहे. ‘मुनमुन ठाकरे अंगणवाडी सेविका,हजारवाडी जि.सांगली’ ‘अनवरा बेगम अंगणवाडी सेविका,बोरगाव बु., जि. लातूर’ या दोन बनावट आयडीद्वारे तब्बल १,१७१ अर्ज भरले गेले.प्रत्यक्ष चौकशीत अशा अंगणवाडी सेविका नसल्याचे उघड झाले आहे.
या परप्रांतिय ठगांनी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करतांना बनावट आधार क्रमांक वापरून अस्पष्ट प्रती अपलोड केल्या,ज्यामुळे पडताळणीवेळी संपूर्ण माहिती स्पष्ट होत नव्हती.
याचाच फायदा घेऊन लाडक्या बहिणीचे पैसे लाटले गेले.मात्र सध्या पोलीस,महसूल तसेच महिला व बालविकास विभाग या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करीत आहेत.आता उत्तर प्रदेश,आसाम, पश्चिम बंगाल आणि राजस्थानातील या फसव्या बहिणींविरोधात गुन्हे दाखल झाले असून त्यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरु आहे
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कारची सायकलला जोरदार धडक; सायकलस्वाराचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-रात्रीच्या सुमारास सायकलने घरी परतणाऱ्या एका शेतकऱ्याला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सायकलस्वार शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर धडकेनंतर...

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना मिळणार दिवाळीपूर्वीच दोन हजाराची भाऊबीज भेट..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीसांसाठी आनंदाची बातमी असून या सर्वांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी...

महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन; राज्यात ५० लाखांहून अधिक अर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेती व शेतीपूरक व्यवसायांमध्ये कार्यरत महिलांना शेतकरी म्हणून अधिकृत ओळख मिळवून देणाऱ्या महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी अधिकाधिक महिलांनी अर्ज करावेत,असे आवाहन आंतरराष्ट्रीय...

अखेर राज्यातील सर्व ग्राम रोजगार सेवकांच्या मानधन वितरणाचा मार्ग मोकळा..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्राम पातळीवर काम करणाऱ्या ग्रामरोजगार सहायकांच्या मानधन वितरणाचा मार्ग अखेर मोकळा झाला असून राज्यातील सर्व...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!