Sunday, May 31, 2026
Homeचंद्रपूररेती तस्करांच्या मागे धावला वाघ; ट्रॅक्टरच्या ट्रालीत उडी घेतल्याने थोडक्यात बचावले मजूर..

रेती तस्करांच्या मागे धावला वाघ; ट्रॅक्टरच्या ट्रालीत उडी घेतल्याने थोडक्यात बचावले मजूर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :- ‘रेती चोरीचा मामला अन् हळूहळू बोंबला’ अश्या कथानक रेती तस्कर रंगवू लागले आहेत.रात्र असो की दिवस,चोरांसाठी सारखेच असतात. अशातच चंद्रपूर जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यात दोन दिवसांपूर्वीच्या रात्री म्हणजेच शनिवारी खतरनाकच घटना दबक्या आवाजात उघडकीस आली आहे रात्रीच्या सुमारास चोरट्यांकडून अवैध रेतीचा उपसा करीत असतांना अचानकपणे डरकाळी फोडून वाघ धावला असता मजुरांनी वेळीच प्रसंगावधान राखत ट्रॅक्टरच्या ट्रालीत उडी घेतल्याने सर्व मजूर थोडक्यात बचावले.सदरची घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास चिमूर तालुक्याच्या पळसगाव वन परीक्षेत्रातील बफरच्या जंगल परिसरातील नदी घाटवर घडली. अवैद्य रेतीतस्करीचे ट्रॅक्टर असल्याने याची वाच्यता कुठेही झाली नसली तरीही याची कानकुण सर्वत्र परिसरात सुरू झाली आहे.अशातच वाघाच्या हल्ल्याने रेती उपसा करण्याकरीता मजूर मिळेनासे झाले आहेत.चिमूर तालुक्यात रेतीतस्करी करण्यासाठी वनविभाग आणि पोलिस,महसूल प्रशासनाने सर्व शासकीय नियम पायदळी तुडवत रेतीतस्करांसाठी मोकळे राण करून दिले आहे. म्हणून दिवसरात्र रेतीचा उपसा होत असतानाही वनविभाग,महसूल व पोलिस यंत्रणा रेती तस्करांसमोर हतबल झाली आहे.परिणामी शासनाचा करोडो रुपयांच्या महसूल बुडत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतातील विहिरीत पडून वाघाचा मृत्यू; वन विभागात खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम/सिंदेवाही(चंद्रपूर):-ब्रम्हपुरी वन विभागांतर्गत येणाऱ्या सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील डोंगरगाव नियतक्षेत्र अंतर्गत हजारीचक(ता.सिंदेवाही) येथील शेतातील कठडे नसलेल्या विहिरीत पडून एका प्रौढ नर वाघाचा मृत्यू...

उद्यापासून वादळी पावसाचा अंदाज; शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-सध्या राज्यातील हवामानात बदल होण्यास सुरुवात झाली असून उद्या,सोमवार १ जून पासून सुरु होणाऱ्या आठवड्यातील हवामानात अजून बदल होणार आहे.हवामान खात्याने,प्रामुख्याने...

तरुणाने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-एका ३६ वर्षीय विवाहित तरुणाने राहत्या घरीच गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची घटना आज,रविवार ३१ मे रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा शहरातील...

विवाहित महिलेचा गळा चिरून हत्या करणारा आरोपी अटकेत.. – क्षुल्लकशा कारणावरून हत्या; बालपणापासून होते प्रेमप्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या धोपटाळा कामगार वसाहतीत एका विवाहित महिलेची धारदार शस्त्राने गळा चिरून निघृण हत्या करण्यात आल्याची थरारक घटना शुक्रवार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!