Thursday, September 3, 2026
Homeनागपूरचोरटे घरफोडी करायला आले; नागरिक धावले असता चप्पल ठेऊनच पळाले..!

चोरटे घरफोडी करायला आले; नागरिक धावले असता चप्पल ठेऊनच पळाले..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-अज्ञात चोरट्यांनी एकाच घरी तिसऱ्यांदा चोरी करण्याचा बेत आखला,अशातच वारंवार चोरी करणाऱ्यांना पकडुन चांगलाच चोप देऊ,असे नागरिकांनी ठरवले.मात्र,नागरिकांनी चोरट्यांना घेराव घालताच चोरट्यांनी विना चप्पलनेच पळ काढल्याची गंमतीशीर घटना नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील दहेगाव (रंगारी) येथे नुकतीच उघडकीस आली. सदर घटनेचा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
अशोक शिंदे,रा.साई मंदिराजवळ,दहेगाव (रंगारी),ता. सावनेर यांच्या घरात शनिवारी मध्यरात्री दोन चोरटे शिरल्याचा शेजाऱ्यांना सुगावा लागला होता.त्यांनी या बाबतची माहिती फोनवरून काही नागरिकांना दिल्याने त्यांनी चोरट्यांना पकडण्यासाठी लगेच योजना आखली.चोरट्यांना पकडण्यासाठी नागरिकांनी हातात लाठ्या घेऊन शिंदे यांच्या घराला व्यवस्थित घेराव केला.घराबाहेर नागरिक असल्याचे लक्षात येताच चोरट्यांनी शिंदे यांच्या घराच्या छतावरून शेजारच्या घरावर उडी मारत खाली उतरून पळ काढला. नागरिकांनी त्यांचा पाठलाग केला.परंतु,ते अंधाराचा फायदा घेत रेल्वे रूळ ओलांडून चनकापूर (ता.सावनेर) च्या दिशेने पळून गेले.दोघेही २५ ते ३० वर्षे वयोगटातील होते,अशी माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली.चोरट्यांनी अशोक शिंदे यांच्या घरी चोरी करण्याचा तिसऱ्यांदा प्रयत्न केल्याची माहिती त्यांच्या शेजाऱ्यांनी दिली.घटनेच्या दिवशी अशोक शिंदे आणि त्यांच्या पत्नी मुंबईला गेले असल्याने घरी कुणी नव्हते.घर कुलूपबंद असल्याचे चोरट्यांनी आधीच हेरले असावे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!