Monday, August 31, 2026
Homeचंद्रपूररेती तस्करांची मुजोरी; वनरक्षकास मारहाण-दोघांवर गुन्हे दाखल…

रेती तस्करांची मुजोरी; वनरक्षकास मारहाण-दोघांवर गुन्हे दाखल…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

चंद्रपूर :-चिमूर वन परिक्षेत्रातील वनरक्षक ऋषी वानोसा हजारे वय ५६ वर्षे हे रात्रपाळीत गदगाव येथील जनार्धन रामचंद्र सातपुते यांच्यासह २४ जानेवारी रोजी बुधवारी गस्तीवर होते.गदगाव-उरकुडपार मार्गावरील शेताजवळील शेकोटी शेकत असतांना रात्री अकरा वाजताच्या सुमारास तिरखुरा येथील ट्रॅक्टर मालक तसचे महसूल कर्मचाऱ्यांनी रेतीच्या गाड्या चालू देत नाही, म्हणून मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली.रेतीतस्कराची जिल्ह्यात किती मुजोरी वाढली आहे.याचा प्रत्यय आला आहे.

चिमूर तालुक्यातील महसूल तसेच वनक्षेत्रातील नदी, नाले,ओढ्यातून मोठ्या प्रमाणात अवैध रेती उत्खनन करून वाहतूक केल्या जात आहे. रेतीतस्करांचा तालुक्यात मुक्तसंचार असुन शेतकरी, सामान्य नागरीक,कर्मचाऱ्यांना साम दाम दंड भेद याचा वापर करून शांत बसविले जात आहे.राजकीय वरदहस्ताने या तस्करांची मुजोरी वाढली आहे.वन परीक्षेत्र चिमूर येथील गदगाव बिट येथे वनरक्षक ऋषी हजारे जंगल क्षेत्रात रेतीतस्करी,शिकारावर आळा घालण्यासाठी बुधवारच्या रात्री जंगल क्षेत्रात गदगाव येथील ओळखीच्या जनार्धन सातपुते यांना घेऊन गस्त घालीत होते.यादरम्यान गदगाव – उरकुडपार मार्गावर रात्रीच्या सुमारास तिरखुरा येथील ट्रॅक्टर मालक सोनू अशोक धाडसे व चिमूर येथील महसूल कर्मचारी राकेश झिरे हे दुचाकींनी उरकुडपारकडून आले. सोनू धाडसे याने अश्लिल शिवीगाळ करीत रेती वाहतुकीच्या गाड्या का थांबविल्या म्हणून विचारू लागला.त्यांवर वनरक्षक हजारे यांनी कोणाच्याही गाड्या चालू देणार नसल्याचे उत्तर दिले.त्यावर राकेश झिरे यांनी शिवीगाळ केली व दोघांनीही धक्का मारीत शेतातील बांधीत पाडले आणि लाथा बुक्यानी मारून पाहून घेण्याची धमकी दिली.

जनार्धन सातपुते यांनी मध्यस्थी करत दोघांचा वेगळे केले.त्यामुळे जिवे मारण्याची धमकी देत दोघेही निघुन गेले.याची माहिती वनपरीक्षेत्र अधिकारी किशोर देऊळकर यांना दिली. लगेच त्यांनी वनरक्षक अक्षय मेश्राम, अमोल पोटे, वनपाल रामदास नैताम व उद्धव लोखंडे यांच्यासह घटनास्थळ गाठले. वनरक्षकासोबत चिमूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली.तक्रारीवरून सोनू धाडसे व राकेश झिरे यांच्यावर भारतीय दंड संहिताच्या कलम ३५३,२९४, ५०६,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सुरू आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

विकृत मानसिकतेचा कळस; चिमुकल्या मुलीसोबत २५ वर्षीय तरुणाचे गैरवर्तन..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काही विकृत मानसिकतेचा कळस गाठलेल्या पुरुषांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे दिसून येत आहे.भोळ्या-भाबड्या चिमुकल्या मुलींना फुस लावून जाळ्यात ओढत कुठे अत्याचार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!