Thursday, July 16, 2026
Homeभंडाराभंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये भीषण स्फोट; एका कामगाराचा मृत्यू-आजची घटना..

भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये भीषण स्फोट; एका कामगाराचा मृत्यू-आजची घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

भंडारा : – शहरालगत असलेल्या जवाहरनगर येथील  ऑर्डनन्स फॅक्टरी(आयुध निर्माणी कंपनीत)आज दिनांक-२७ जानेवारी रोजी सकाळी नऊच्या सुमारास भीषण स्फोट झाला.यात एका कामगाराचा मृत्यू झाला.अविनाश मेश्राम असे मृत कामगाराचे नाव आहे.प्राप्त माहितीनुसार,सी एक्स विभागात हा स्फोट झाला आहे.अविनाश मेश्राम नेहमीप्रमाणे आज सकाळी पहिल्या शिफ्टमध्ये पहाटे ६ वाजता कामावर गेला असता अनपेक्षितपणे अडीच तासांतच ही घटना घडली.दरम्यान,स्फोट होताच ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये तारांबळ उडाली.स्फोटानंतर लागलेली आग फॅक्टरीचे अग्नीशमन दलाने तातडीने आटोक्यात आणली. यापूर्वी देखील भंडारा शहरालगत असलेल्या सनफ्लॅग कंपनीत स्फोटाची घटना घडली होती.त्यामध्ये तीन कर्मचारी जखमी झाले होते.यावर्षी भंडारा जिल्ह्यात घडलेली स्फोटाची ही दुसरी घटना आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज २२ मिनी सेतू केंद्रांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण.. दुर्गम भागात लोकाभिमुख डिजिटल प्रशासनाला नवी दिशा..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई/गडचिरोली :-गडचिरोलीत नक्षलवादाचा प्रभाव कमी झाल्यानंतर आता प्रशासनाची जबाबदारी अधिक वाढली असून दुर्गम भागातील नागरिकांना केवळ प्रशासनाची उपस्थिती नव्हे,तर प्रशासनाचा लोकाभिमुख चेहरा...

वनहक्क पट्टेधारकांसाठी मोठा निर्णय; शेतकरी म्हणून मिळणार स्वतंत्र ओळख.. – विविध योजनांचाही मिळणार लाभ..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-वनहक्क पट्टेधारकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.वनहक्क कायद्यांतर्गत पात्र ठरलेल्या अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक वननिवासींना आता सुधारित सातबारा मिळणार असल्याने...

गडचिरोली जिल्ह्यात खतांचा मुबलक साठा; शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.. – खताची जादा दराने विक्री केल्यास करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता व घाबरून न...

दहावीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार; दोन आरोपी फरार..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यात एक धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.दोन नराधमांनी इयत्ता दहावीत शिकणाऱ्या मुलीच्या असह्यतेचा गैरफायदा घेत पैश्याचे आमिष दाखवून वारंवार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!