Thursday, July 30, 2026
Homeभंडारामोठा अनर्थ टळला -शॉर्टसर्किटमुळे जिल्हाधिकारी कार्यालयात लागली आग…

मोठा अनर्थ टळला -शॉर्टसर्किटमुळे जिल्हाधिकारी कार्यालयात लागली आग…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

भंडारा :-जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असताना भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयात मात्र,आग लागल्याची घटना शनिवारी दिनांक-सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली.इलेक्ट्रिक पॅनलमध्ये शॉर्टसर्किट होऊन वायरिंग जळाल्याने सर्वत्र धूर पसरला होता.ही बाब लक्षात येताच लगेच महावितरणचे वीज कर्मचारी व पालिकेच्या अग्निशमन दलाला सूचना देऊन पाचारण करण्यात आले.वीज कर्मचाऱ्यांनी वीजपुरवठा खंडित केला,तर अग्निशमन दलाने काही क्षणातच आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला.भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीमध्ये विविध विभागाचे स्वतंत्र कक्ष आहेत.या कक्षाबाहेरील भिंतीवर इलेक्ट्रिक पॅनल लावलेले असून याच ठिकाणावरून संपूर्ण कार्यालयातील वीजपुरवठ्याचे नियंत्रण व संचलन केले जाते.येथे मेनस्वीच व अन्य बोर्डसुद्धा लावलेले आहेत.त्यातील एका बोर्डात शॉर्टसर्किट होऊन धूर निघू लागला.पाहता पाहता हा धूर लगतच्या सर्वच कक्षात पसरला.शनिवार सुटीचा दिवस असून सध्या महसूल कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे.त्यामुळे कार्यालयात कर्मचारी नव्हते.तेथे असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या लक्षात हा प्रकार येताच त्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविले.अग्निशामक दल आणि वीज वितरण कर्मचाऱ्यांनासुद्धा घटनेची माहिती देण्यात आली.ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी; असा प्राथमिक अंदाज आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे २५ मार्ग बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नुकतेच दोन दिवसांपूर्वी नागपूरच्या  प्रादेशिक हवामान खात्याने गडचिरोली जिल्ह्यासाठी काल,बुधवार २९ जुलै रोजी रेड अलर्ट,तर आज गुरुवारसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला होता. त्यानुसार,जिल्ह्याच्या...

लाखो रुपयांचा विदेशी दारूसाठा जप्त; कार ठेवून पळाला आरोपी..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अवैधरीत्या दारूची वाहतूक करणाऱ्या कारचा पाठलाग करण्यात आला.दरम्यान,चालकाने पोलिसांना चकमा देण्याचा प्रयत्न केला खरी,पण त्याचा प्रयत्न...

ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी; …अन्यथा एसटी बसची मिळणारी सवलत होणार बंद..!

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड(NCMC)अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार,येत्या शनिवार...

देसाईगंज येथे स्काऊट-गाईड विषयावरील मार्गदर्शन व उजळणी वर्ग उत्साहात संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-भारत स्काऊट-गाईड्स जिल्हा कार्यालय गडचिरोली व जिल्हा परिषद शिक्षण विभाग (प्राथमिक/माध्यमिक)गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच राजर्षी शाहू महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!