- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-एका १९ वर्षीय तरुणाने आपल्या जन्मदात्या बापाचा खून केल्याची घटना आज,सोमवार २३ फेब्रुवारी रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील भिसी नगरपंचायत हद्दीत सकाळच्या सुमारास उघडकीस आली.मच्छिंद्रनाथ आनंदराव मेश्राम वय ५१ वर्षे, रा.भिसी,ता.चिमूर,जि.चंद्रपूर असे मृत वडिलाचे नाव आहे.तर संदेश मच्छिंद्रनाथ मेश्राम वय १९ वर्षे असे आरोपी मुलाचे नाव आहे.मृतक मच्छिंद्रनाथ मेश्राम हे मुळचे सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर गावचे रहिवाशी होते.ते २० वर्षापूर्वी चिमूर तालुक्यातील भिसी येथे आले व येथेच कुटुंबासह वास्तव्यास आहेत.
मृतक मच्छिंद्रनाथ मेश्राम यांच्या त्रासदायक स्वभावामुळे कुटूंबीय तसेच परिसरातील नागरिक वैतागले होते.त्याला दारूचे व्यसन जडले होते.नेहमी दारू पिऊन पत्नी व मुलाला शिवीगाळ व मारहाण करीत होते.काल,रविवार २२ फेब्रुवारी रोजी गावात साक्षगंधाचा कार्यक्रम असल्याने संदेश मेश्राम हा जेवण वाढण्यासाठी गेला होता.जेवण आटोपल्यानंतर संदेश घरी परतला.रात्री ११ वाजता वडील मच्छिंद्रनाथ मेश्राम हे दारूच्या नशेत घरी आले असता संदेशने जेवण आणले आहे करून घ्या,असे म्हणाला असता वडीलाने मला अजून दारू प्यायची आहे, मी पुन्हा घेऊन येतो,असे म्हटल्यावर मुलाने आता जाऊन नका.मात्र,वडील ऐकण्याच्या स्थितीत नव्हते.मुलाने अडवणूक करताच अडवणूक करताच वडिलांनी मुलाला शिवीगाळी करणे सुरु केले.त्यामुळे,मुलगा संदेशचा राग अनावर झाला.त्याने घरातील नायलॉन दोरीने वडिलांचा गळा आवळून खून केला.घटनेच्या दिवशी संदेश व मृतक वडील हे दोघेच घरी होते.वडिलांना मारल्याची बाब स्वतः आरोपीने सिंदेवाही तालुक्यात राहणाऱ्या मोठा भाऊ पंचशील मेश्राम वय २२ वर्षे याला फोन करून सांगितली.वडिलांचा खून झाला अशी माहिती मिळाल्यावर पंचशील मेश्राम भिसी मध्ये दाखल झाला.वडील नेहमी दारू पिऊन मला व आईला शिवीगाळ करीत होते म्हणून मी रागाच्या भरात वडिलांचा गळा आवळला,असे संदेशने भावाला सांगितले.पंचशीलने तात्काळ घडलेल्या प्रकारची माहिती भिसी पोलिसांना दिली.सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश भोंगाडे यांनी तात्काळ घटनास्थळ गाठत संदेशला ताब्यात घेत विचारपूस केली असता वडिलाने गळफास घेत आत्महत्या केल्याचा त्याने बनाव केला.पोलीसांचा दंडुका बसताच तो पोपटासारखा बोलू लागला व खुनाची कबुली दिली.प्रकरणी आरोपी संदेश मेश्राम याचेवर भारतीय न्याय संहिता कलम १०३(१)अन्वये भिसी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
- Advertisement -

