Thursday, June 25, 2026
Homeचंद्रपूरमित्र नदीत बुडाला तरीही राहिले गप्प; शोधाशोध करताच सापडला मृतदेह..!

मित्र नदीत बुडाला तरीही राहिले गप्प; शोधाशोध करताच सापडला मृतदेह..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-शाळेला सुट्टी असल्याने तीन मित्र सहा किलोमिटर अंतरावर असलेल्या नदीवर गेले.नदीवरील बंधाऱ्यातील दृश्य पाहून एकास आंघोळ करण्याची इच्छा झाल्याने त्याने उडी मारली.उडी मारताच खाली गेला,तो वर आलाच नाही आणि बुडून मृत्यू झाला. अश्यातच सहकारी दोन मित्र घाबरले.घटना घडून रात्र झाली तरीही गप्प राहिले.कुटुंबीयांनी शोधाशोध केली असता सदर प्रकरण उजेडात आले.सदरची घटना चंद्रपूर जिल्ह्याच्या सावली शहरापासून सहा किलोमिटर अंतरावर असलेल्या चिमढा नदीत घडली.सोहम प्रमोद मोहुर्ले वय १५ वर्षे,रा.ता.सावली, जि.चंद्रपूर असे नदीत बुडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.सोहम हा सावली येथील रमाबाई आंबेडकर विद्यालयात इयत्ता दहाव्या वर्गात शिक्षण घेत होता.
रविवारी शाळेला सुट्टी असल्याने सोहम आणि त्याचे दोन मित्र सावली शहरापासून सहा किलोमिटर अंतरावर असलेल्या चिमढा नदी किनारी फिरायला गेले.नदी किनारी पोहचताच आंघोळ करण्यासाठी सोहमने नदीवरील बंधाऱ्यात उडी मारली.उडी मारली तेव्हा मित्र सोबत होते.सोहम पाण्याबाहेर न आल्याने दोघेही घाबरून घरी पोहचले.रात्र होऊनही आपला मुलगा घरी आला नसल्याने मोहुर्ले कुटुंबीयांनी परिसरात विचारपूस केली.काहींनी दुपारच्या सुमारास मित्रांबरोबर फिरायला गेला असल्याचे सांगितल्याने प्रकरणाची माहिती झाली.त्यानुसार कुटुंबीयांनी सावली पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.रात्र झाल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली.परत काल सोमवारी शोधाशोध केली असता सायंकाळी सहाच्या सुमारास सोहमचा मृतदेह सापडून आल्याने पोलिसांनी मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला.घटनेने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सावधान..! जिल्हा परिषद शाळांतील परिचर भरतीची सोशल मीडियावरील जाहिरात बनावट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सोशल मीडियावर जिल्हा परिषद शाळांमध्ये परिचर(Peon)पदभरतीसंदर्भात प्रसारित होत असलेली जाहिरात पूर्णपणे खोटी,बनावट आणि दिशाभूल करणारी असल्याचा अधिकृत खुलासा जिल्हा परिषदेचे मुख्य...

वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट बसवा; अन्यथा १ जुलैपासून दंडात्मक कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट(HSRP)बसविणे बंधनकारक केले आहे.या कामासाठी शासनाने...

बापरे..! जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यतेचे आदेश.. – चक्क जिल्हाधिकाऱ्यांचे पोलीस अधीक्षकांना कारवाईचे पत्र..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा खनिज प्रतिष्ठान(डीएमएफ) गडचिरोली यांच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यता आदेश तयार करून प्रसारित करण्यात आल्याच्या गंभीर प्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा...

आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सन-१९९७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी तथा राष्ट्रपती पदक सन्मानित 'धडाकेबाज' अधिकारी ५३ वर्षीय विश्वास नांगरे पाटील आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त असणार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!