Thursday, June 25, 2026
Homeगडचिरोलीउद्याला आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके गडचिरोलीत..

उद्याला आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके गडचिरोलीत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके हे उद्या,बुधवार ३० जुलै रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत.या दौऱ्यात ते विविध शासकीय कार्यक्रमांना उपस्थित राहून आदिवासी विकास योजनांची अंमलबजावणी, स्थानिक विकासकामांचा आढावा आणि लाभार्थ्यांना योजना वितरण कार्यक्रमात सहभागी होणार असून नागपूर विभागातील आदिवासी विभागाचा आढावा घेणार आहेत.सकाळी ९.३० वाजता शासकीय विश्रामगृह गडचिरोली येथे आगमन.१०.३० वाजता शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा,सेमाना येथे वृक्षारोपण.११ वाजता सुमानंद सभागृह,आरमोरी रोड येथे आयोजित रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन व विविध आश्रमशाळा व वसतीगृहांच्या इमारतींचे आभासी लोकार्पण.यासोबतच पी.एम.जनमन व धरती आबा योजनांचे लाभार्थी मेळावा व विविध आदिवासी योजनांअंतर्गत लाभ वितरण कार्यक्रम.  दुपारी १.३० ते २.३० राखीव.दुपारी २.३० ते ४.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे नागपूर विभागीय आढावा बैठकीत आदिवासी विभागाच्या जनजाती न्याय महाअभियान,धरती आबा ग्राम उत्कर्ष योजना, वनहक्क दावे व अतिक्रमण संबंधित प्रश्न व आदिवासी महामंडळ योजनांची अंमलबजावणी या प्रमुख योजनांचा आढावा घेण्यात येणार आहे.यानंतर सायंकाळी सोयीनुसार गडचिरोलीहून यवतमाळकडे प्रयाण करतील.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सावधान..! जिल्हा परिषद शाळांतील परिचर भरतीची सोशल मीडियावरील जाहिरात बनावट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सोशल मीडियावर जिल्हा परिषद शाळांमध्ये परिचर(Peon)पदभरतीसंदर्भात प्रसारित होत असलेली जाहिरात पूर्णपणे खोटी,बनावट आणि दिशाभूल करणारी असल्याचा अधिकृत खुलासा जिल्हा परिषदेचे मुख्य...

वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट बसवा; अन्यथा १ जुलैपासून दंडात्मक कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट(HSRP)बसविणे बंधनकारक केले आहे.या कामासाठी शासनाने...

बापरे..! जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यतेचे आदेश.. – चक्क जिल्हाधिकाऱ्यांचे पोलीस अधीक्षकांना कारवाईचे पत्र..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा खनिज प्रतिष्ठान(डीएमएफ) गडचिरोली यांच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यता आदेश तयार करून प्रसारित करण्यात आल्याच्या गंभीर प्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा...

आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सन-१९९७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी तथा राष्ट्रपती पदक सन्मानित 'धडाकेबाज' अधिकारी ५३ वर्षीय विश्वास नांगरे पाटील आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त असणार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!