Thursday, June 25, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तयोजनेसाठी आधार कार्ड बंधनकारक असतांना पुरुषांच्या खात्यात पैसे जमाच झाले कसे? -...

योजनेसाठी आधार कार्ड बंधनकारक असतांना पुरुषांच्या खात्यात पैसे जमाच झाले कसे? – लाडकी बहीण योजनेत ४ हजार ८०० कोटींचा घोटाळा- खासदार सुप्रिया सुळे

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-लाडकी बहिण योजना महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू केली.परंतु,या योजनेत तब्बल ४ हजार ८०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या(शरद पवार गट)खासदार सुप्रिया सुळे यांनी  केला आहे.सुप्रिया सुळे यांच्या मते,कष्टकरी महिलांचे पैसे चुकीच्या पद्धतीने पुरुषांच्या खात्यात वर्ग झाले आहेत.या प्रकरणात पारदर्शक चौकशीची मागणी करत सुळे यांनी सरकारला कठोर शब्दांत इशारा दिला आहे.त्यांच्या मते,योजनेसाठी आधार कार्ड बंधनकारक असतांना,पुरुषांच्या खात्यात पैसे कसे जमा झाले,हा मोठा प्रश्न आहे.“महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती गंभीर आहे.अशा परिस्थितीत कष्टकरी महिलांचे पैसे चुकीच्या व्यक्तींकडे गेले,याची चौकशी विशेष तपास पथकाद्वारे (एसआयटी)व्हायला हवी,” असे सुळे यांनी ठणकावले. लाडकी बहीण योजनेचे २६ लाख अर्ज फेटाळण्यात आले आहेत.पहिल्या टप्प्यात २६ लाख अर्ज कां फेटाळले गेले नाहीत? योजनेसाठी वापरले गेलेले सॉफ्टवेअर कोणते होते आणि त्यात त्रुटी का आल्या? सुळे यांनी या घोटाळ्याला ‘लहान’ नसून,अत्यंत गंभीर बाब मानली आहे. “हा ४ हजार ८०० कोटींचा घोटाळा आहे. सरकारला याचे उत्तर द्यावे लागेल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सावधान..! जिल्हा परिषद शाळांतील परिचर भरतीची सोशल मीडियावरील जाहिरात बनावट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सोशल मीडियावर जिल्हा परिषद शाळांमध्ये परिचर(Peon)पदभरतीसंदर्भात प्रसारित होत असलेली जाहिरात पूर्णपणे खोटी,बनावट आणि दिशाभूल करणारी असल्याचा अधिकृत खुलासा जिल्हा परिषदेचे मुख्य...

वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट बसवा; अन्यथा १ जुलैपासून दंडात्मक कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट(HSRP)बसविणे बंधनकारक केले आहे.या कामासाठी शासनाने...

बापरे..! जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यतेचे आदेश.. – चक्क जिल्हाधिकाऱ्यांचे पोलीस अधीक्षकांना कारवाईचे पत्र..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा खनिज प्रतिष्ठान(डीएमएफ) गडचिरोली यांच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यता आदेश तयार करून प्रसारित करण्यात आल्याच्या गंभीर प्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा...

आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सन-१९९७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी तथा राष्ट्रपती पदक सन्मानित 'धडाकेबाज' अधिकारी ५३ वर्षीय विश्वास नांगरे पाटील आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त असणार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!