- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-तलावावर मासे पकडण्यासाठी जातो म्हणून घरून निघालेला इसम रात्र होऊनही घरी परतला नसल्याने गावकऱ्यांनी काल,४ डिसेंबरच्या रात्री शोध मोहीम राबविली.शोध मोहीम राबवित असतांना काल रात्री ११ वाजताच्या सुमारास सदर इसमाचा जंगलात मृतदेह दिसून आला.मृतदेह पाहताच त्याच्यावर वाघाने हल्ला करुन ठार केल्याचे निदर्शनास आले. लक्ष्मण डोमा मोहणकर वय ५० वर्षे रा.पिटेसूर, ता.मोहाडी असे मृत व्यक्तिचे नाव आहे.
सदरची घटना जांब कांद्री वनपरिक्षेत्राअंतर्गत पिटेसुर जंगल परिसरात घडली.घटना उघडकीस येताच
तात्काळ वन विभागाला सूचना देण्यात आली.वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून मृतदेह मोहाडी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले.परिसरात वाघाने हल्ला करुन ठार केल्याची पहिलीच घटना असल्याने परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
- Advertisement -

