Wednesday, August 5, 2026
Homeवर्धामानलं आमदाराला..! शेतकरी मारहाण प्रकरणी विधिमंडळात मुद्दा; ठाणेदारासह वनपरिक्षेत्र अधिकारी निलंबित..

मानलं आमदाराला..! शेतकरी मारहाण प्रकरणी विधिमंडळात मुद्दा; ठाणेदारासह वनपरिक्षेत्र अधिकारी निलंबित..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
वर्धा :-गोर-गरिबांना कचाट्यात पकडणे व मोठ्यांना सोडून देणे,असा प्रकार सर्वत्र दिसून येतो आहे; यावर कुठेतरी आळा घातला जाणे आवश्यक आहे; अन्यथा कुणी कोणालाही मोजणार नाही.’हम करेसो कायदा’ अशी स्थिती झाल्याशिवाय राहणार नाही.एखादा वचप अत्यावश्यक आहे.लोकप्रतिनिधींनी मनात आणले तर काही प्रमाणात कां असेना..! जनतेचा नक्कीच कल्याण होईल,मात्र काही लोकप्रतिनिधी आपल्याच धुंदीत रंगपंचमी खेळण्यात व्यस्त असतात. मात्र,याला अपवाद असल्याचे वर्धा जिल्ह्याच्या आर्वी विधानसभा क्षेत्राचे आमदार सुमित वानखेडे यांच्या कार्यावरून नुकतेच निदर्शनास आले आहे.एका शेतकऱ्यास नाहक बेदम मारहाण केल्याने त्यांनी याबाबत विधिमंडळात मुद्दा उपस्थित केला.प्रकरणी बोर व्याघ्र प्रकल्पातील बफरक्षेत्राचे हिंगणी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी अभय ताल्हण यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. संबंधित आदेश काल मंगळवारी सायंकाळी बोर व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालक,वर्धा येथील कार्यालयाला प्राप्त झाला.अभय ताल्हण यांना निलंबन कालावधीत बोर व्याघ्र प्रकल्पाचे वर्धा येथील उपसंचालक कार्यालय मुख्यालय देण्यात आले आहे.वन्यजीव विभागाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या हिंगणी वनपरिक्षेत्रातील बोरगाव (गोंडी) येथील एका शेतकऱ्याला वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी मारहाण केली.पण,या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात हयगय करण्यात आल्याचा ठपका ठेवत खरांगणाचे ठाणेदार सदाशिव ढाकणे यांना सोमवारी १७ मार्चला पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांनी निलंबित केले,तर आता काल, मंगळवारी १८ मार्चला हिंगणी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी अभय ताल्हण यांना निलंबित करण्यात आले आहे.
जंगलाला आग लावल्याचा आरोप करीत बोरगाव (गोंडी) येथील शेतकरी नारायण कौरती यांना वन परिक्षेत्र अधिकारी अभय ताल्हण,अनिल काळे,गोविंद चंद्रवंशी,दुर्गाप्रसाद अंभोरे यांनी मारहाण केली. शेतकऱ्याला मारहाण करणे हा प्रकार गंभीर असल्याचे सांगत आमदार सुमित वानखेडे यांनी विधिमंडळात मुद्दा उपस्थित करून दोषींवर कारवाईची मागणी केली.त्यानंतर वर्धेचे पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांनी खरांगणाचे ठाणेदार सदाशिव ढाकणे यांना कर्तव्यात हयगय केल्याचा ठपका ठेवून सोमवारी निलंबित केले तर काल मंगळवारी वन परिक्षेत्र अधिकाऱ्यास निलंबित करण्यात आले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बापरे..!अंतिम संस्काराची तयारी सुरू असतांनाच मृतक व्यक्तीने उघडले डोळे..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्यात एक अचंभित करणारी घटना काल मंगळवारी उघडकीस आली.एका ४० वर्षीय व्यक्तीची प्रकृती अचानक खालावल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल...

ऑगस्ट महिन्यापासून गॅस कनेक्शनची ई-केवायसी असणे बंधनकारक; अन्यथा कनेक्शन होणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त :-गॅस सिलिंडरचा काळाबाजार थांबवण्यासाठी आणि साठेबाजी उघड करण्यासाठी केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील गॅस कंपन्या इंडेन, एचपी आणि भारत गॅसच्या ग्राहकांसाठी स्वयंपाकाच्या...

आता बनावट किंवा खोट्या कागदपत्रांच्या आधारे जातवैधता प्रमाणपत्र तयार करणे पडणार महागात..

उद्रेक न्युज वृत्त :-बरेचदा जातवैधता प्रमाणपत्र अर्थात कॉस्ट व्यालीडिटी सर्टिफिकेट बनावट किंवा खोट्या कागदपत्रांच्या आधारे बनवून शासकीय योजनांचा लाभ मिळवणे,शासकीय नोकरी,अभियांत्रिकी प्रवेश व इतर...

महामार्गाच्या विस्तारासाठी सरकारने शेतकऱ्यांना भूमिहीन करू नये- विजय वडेट्टीवार

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा विस्तार भंडारा,गोंदिया,गडचिरोली आणि चंद्रपूरपर्यंत करण्यासाठी सुरू असलेल्या भूसंपादनात व सुपिक जमीन घेण्यासाठी प्रशासनाकडून बळजबरी केली जात असल्याचा आरोप...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!