Saturday, August 29, 2026
Homeचंद्रपूरमनोरुग्ण,निराधार,वेड्या लोकांचा आधार बनले समाजदूत परमेश्वर मडावी.. - लोकसहभागातून छत्रपती शिवाजी महाराज...

मनोरुग्ण,निराधार,वेड्या लोकांचा आधार बनले समाजदूत परमेश्वर मडावी.. – लोकसहभागातून छत्रपती शिवाजी महाराज आश्रमाची निर्मिती.. – मुख्याधिकारी माधुरी मडावी यांच्या हस्ते लोकार्पण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-स्वतःचा विसर पडल्याने जगभराच्या वेदना सोबत घेऊन वन वन फिरणारी व्यक्ती म्हणजे मनोरुग्ण.! वेगवेगळ्या कारणाने मनोरुग्ण झालेल्यांना ते कोण, कुठले,हे भानच नसलेल्या मनोरुग्ण,निराधार,वेड्या लोकांचा आधार बनलेले समाज दूत परमेश्वर मडावी यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील नांदेड येथे डोमाजी आधार फाउंडेशनची निर्मिती करून सामाजिक बांधिलकी जोपासली.त्या माध्यमातून लोकसहभागातून छत्रपती शिवाजी महाराज आश्रमाची (निवारागृह)निर्मिती केली.नुकतेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून या आश्रमाचे लोकार्पण माजी यवतमाळच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी यांच्या हस्ते पार पडले.या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन कारंजाच्या मुख्याध्यापिका पूजा चल्लावार-शांतलवार यांनी केले. अध्यक्षस्थानी प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी डॉ.रवींद्र चल्लावर होते.तर प्रमुख अतिथी म्हणून श्रीलक्ष्मी पतसंस्थेचे अध्यक्ष विनोद बोरकर,माजी जिल्हा परिषद सदस्य खोजराम मरस्कोल्हे,यवतमाळच्या माजी मुख्याधिकारी माधुरी मडावी,तळोधी पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल गुहे,सोनुलीचे माजी सरपंच प्रमोद गायकवाड,सामाजिक कार्यकर्ते सादिक शेख,शिक्षक विलास चल्लावार,पोलीस पाटील शितल इचकापे आदींची उपस्थिती होती.समाजातील उपेक्षित घटकांना सुरक्षित निवारा,अन्न,वस्त्र आणि मायेचा आधार मिळावा या उदात्त हेतूने लोकसहभागातून हे निवारागृह उभारण्यात आले आहे.बांधकामासाठी रविंद्र चल्लावार यांनी एक लाख रुपये राशीची मदत केली.याशिवाय सुनीता चाल्लावार-शांतलवार व सीमा राजेश्वर गावंडे यांनी प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत केली आहे. कार्यक्रमाचे संचालन व आभार माजी उपसरपंच दुर्वेश रामटेके यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गावातील अनेक तरुणांनी सहकार्य केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळेत राखी मेकिंग स्पर्धा व रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न.. -विद्यार्थ्यांनी देसाईगंज पोलिस बांधवांना राखी बांधून व्यक्त केली...

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या 'पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनी वडसा' येथे आज,शनिवार २९ ऑगस्ट रोजी 'एक राखी देशाचे...

पोलीस दलात खळबळजनक घटना..! पोलीस उपनिरीक्षकाने धावत्या रेल्वे समोर घेतली उडी; घटनास्थळीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच १६ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क व अर्ज शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय)यांनी शासकीय निवासस्थानी गळफास...

देसाईगंज तालुक्यात रोजगार हमीच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार.. – काम न करताच उचलली लाखो रुपयांची बिले..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यात यंत्रणा स्तरावरून करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये मोठा कथित भ्रष्टाचार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.यात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या...

सर्व अन्न विक्रेते व्यावसायिकांना परवाना घेणे बंधनकारक.. – पाणीपुरी पासून ते चहा विक्रेते व इतर परवाना नसणाऱ्यांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-अन्न व्यावसायिक विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम ३१ अंतर्गत परवाना घेणे किंवा नोंदणी प्रमाणपत्र घेणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!