Wednesday, July 15, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज राजश्री शाहू महाराज नगर परिषद शाळेत शिक्षण समितीची सर्वसाधारण सभा उत्साहात...

देसाईगंज राजश्री शाहू महाराज नगर परिषद शाळेत शिक्षण समितीची सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-नगर परिषद देसाईगंज शिक्षण समितीची सर्वसाधारण सभा काल गुरुवारी देसाईगंज शहराच्या राजश्री शाहू महाराज नगर परिषद प्राथमिक शाळा भगतसिंग वॉर्ड येथे उत्साहात व नियोजनबद्ध वातावरणात पार पडली.सदर सभेस नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या आठही शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. सभेच्या अध्यक्षस्थानी देसाईगंज नगर परिषदेच्या नगराध्यक्षा लता सुंदरकर होत्या.यावेळी बाळकृष्ण माडूरवार(सभापती,शिक्षण विभाग),चैतनदास विधाते (सभापती,आरोग्य व स्वच्छता विभाग),सचिन खारकाटे (सभापती,पाणीपुरवठा विभाग),आशा दहिवले (सदस्या),राधिका पत्रे(सदस्या)तसेच विलास लोखंडे (सदस्य) आदी मान्यवर उपस्थित होते.
शिक्षण सभापती बाळकृष्ण माडूरवार यांनी नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या आठही शाळांच्या मुख्याध्यापकांकडून शाळांच्या भौतिक सुविधांबाबत सविस्तर आढावा घेतला.सभेमध्ये शाळांना आवश्यक असणाऱ्या भौतिक सुविधा,शौचालय व्यवस्था,स्वच्छ पिण्याचे पाणी तसेच इतर मूलभूत गरजा या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध प्रस्तावांवर ठराव पारित करण्यात येऊन त्यास सभेमध्ये एकमताने मंजुरी प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाचे संचलन मुख्याध्यापिका वंदना उसेंडी यांनी सुयोग्यरीत्या केले.सभेचे प्रास्ताविक शिक्षण विभाग प्रमुख ए.एस.आमनर(केंद्रप्रमुख,समूह साधन केंद्र देसाईगंज)यांनी मांडले.शेवटी आभार प्रदर्शन शिक्षक येरणे यांनी करून सभेची सांगता करण्यात आली.सदर सभेमुळे नगरपरिषद अंतर्गत शाळांच्या भौतिक सुविधांमध्ये लवकरच सकारात्मक व दर्जेदार बदल घडून येतील,असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आजपासून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७ (१) व (३)अन्वये संपूर्ण गडचिरोली...

महत्त्वपूर्ण निर्णय..चंद्रपूर डाक विभागातून विभाजन होऊन आता गडचिरोली स्वतंत्र डाक विभाग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत डाक विभागाने चंद्रपूर डाक विभागातून गडचिरोली डाक विभागाचे प्रशासकीय विभाजन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.या...

पदाचा दुरुपयोग; चार लाखाची झाडे विकली एक लाखात,सरपंच अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काहीजण एखाद्या पदावर विराजमान झाले की,स्वतःला मोठे पदाधिकारी समजून मनमर्जीने निर्णय घेण्याचा सपाटा चालवतांना दिसून येतात.पण,आपल्या मागची पार्श्वभूमी काय होती आणि...

आता भेसळयुक्त आणि दूषित अन्नाची एकाच तक्रारीवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच एफएसएसएआयने भेसळयुक्त आणि दूषित अन्नावर कारवाई करण्यासाठी 'फूड सेफ्टी कनेक्ट' ॲप सुरू केले आहे.या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!