Friday, September 4, 2026
Homeचंद्रपूरमद्य प्रेमिंच्या जीवाशी खेळ; चक्क चकन्यात अळ्या..

मद्य प्रेमिंच्या जीवाशी खेळ; चक्क चकन्यात अळ्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-सर्वचजण मद्य प्राशन करतात असे नाही, काहीजण ‘मिली तो मारी अन्यथा सदा ब्रम्हचारी’ असेही असतात.त्यातच काहींचा वेळ ठरलेला असतो,दिवसभर इतर कामे करून घ्यायची व नंतर सायंकाळच्या सुमारास सब ‘शिकवे गीले’ दूर करायचा बेत आखत असतात.असाच बेत आखणाऱ्या मद्य प्रेमींना जोरदार झटका बसला आहे.चंद्रपूर जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातील राजुरा-बामणी मार्गावर असलेल्या एका बार अँड रेस्टॉरंटमध्ये मद्य प्राशन करण्यास गेलेल्या मद्य प्रेमींना चकन्यात  दिलेल्या चाट मसाल्यात चक्क जिवंत अळ्या आढळून आल्याने एकच तारांबळ उडाली आहे.सदरचा धक्कादायक प्रकार शनिवारी सायंकाळच्या सुमारास उघडीस आला असून हॉटेल मालक ग्राहकांच्या जीवाशीनिशी खेळत असल्याने सदर हॉटेल मालकावर कारवाई करून हॉटेलचा परवाना रद्द करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
राजुरा-बामणी मार्गावर एक बार अँड रेस्टॉरंट आहे. हॉटेल मध्ये मद्य प्राशन करण्यासाठी गेलेल्या ग्राहकांनी मद्य बोलावले.मद्यासोबत बारच्या वतीने काही ठिकाणी ग्राहकांना काहीतरी चकना दिल्या जाते.सदर ग्राहकांना चकना म्हणून चाट मसाला देण्यात आला.त्यातच दिलेल्या चाट मसाल्यात चक्क जिवंत अळ्या आढळून आल्याने ग्राहकांनी डोक्यावर हात ठेवला.ग्राहकाच्या लक्षात येताच त्यांनी हॉटेल मॅनेजरला बोलावून निकृष्ट दर्जाचा चाट मसाला,त्यात जिवंत अळ्या असल्याचे दाखविताच त्यांची तारांबळ उडली.त्यावेळेला हॉटेल मध्ये असलेल्या इतरही ग्राहकांनी रोष व्यक्त केला. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि अन्न व औषध विभागाने या हॉटेलची व हॉटेलच्या स्वयंपाक गृहाची तपासणी करून नियमानुसार याठिकाणी मद्याची विक्री होते की नाही,जीएसटी प्रमाणे बिल दिल्या जाते की नाही, स्वयंपाक गृहात योग्य काळजी व स्वच्छता राखली जाते की नाही,यासह अन्य बाबींची तपासणी करून  कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!