Monday, July 13, 2026
Homeदेसाईगंजहृदयद्रावक घटना.. बापा सोबत खेळता-खेळता दोन महिन्याच्या चिमुकलीने सोडला प्राण.. ...

हृदयद्रावक घटना.. बापा सोबत खेळता-खेळता दोन महिन्याच्या चिमुकलीने सोडला प्राण.. – कोंढाळा येथील आजची घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुका मुख्यालयापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या कोंढाळा गावात आज,सोमवार १० मार्चला सकाळच्या सुमारास हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.एका दोन महिन्याच्या चिमुकलीने वडीलासोबत खेळता-खेळता अचानकपणे प्राण सोडल्याने कुटुंबियांवर मोठा आघात झाला.सान्वी उमेश राऊत वय २ महिने रा.कोंढाळा, ता.देसाईगंज (वडसा),जि.गडचिरोली असे मृत चिमुकलीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार,नेहमीप्रमाणे चिमुकलीच्या आईने  आज सोमवारी सकाळी ७.१५ वाजेच्या दरम्यान बाळाला दूध पाजले.दूध पाजल्यानंतर काही वेळाने बाळाचे वडील उमेश राऊत वय २५ वर्षे हे चिमुकली सोबत गोंजरून खेळू लागले.अशातच खेळता-खेळता सकाळी ७.३० च्या सुमारास चिमुकलीच्या नाकावाटे व तोंडातून दूध बाहेर निघू लागले.तितक्यातच जवळच असलेल्या आईने चिमुकल्या बाळाकडे धाव घेतली.तोपर्यंत चिमुकल्या बाळाची प्राणज्योत मालवली.आई-वडिलांनी चिमुकलीला बराच वेळ आवाज देऊनही बाळाने कुठलीही हालचाल न केल्याने कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला.घटनेची माहिती गावात पसरताच महिलांनी एकच गर्दी केली होती.नुकतेच बुधवारी ५ मार्चला चिमुकल्या सान्वीचा नामकरण विधीचा कार्यक्रम पार पडला होता व अवघ्या पाच व्या दिवशीच अनुचित घटना घडल्याने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

यालाच म्हणतात खरे राजकारण..! स्थानिक आमदारांची चुप्पी; तर बाहेरच्या आमदारांना चिंता..

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-काही कालावधीपासून राज्याच्या विविध भागात अवैध रेती उत्खनन आणि रेती तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.रेतीतून मिळणारा बक्कळ पैसा अनेकांना करोडपती,तर काहींना रोडपती...

तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त; दोन आरोपींना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीत नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त करून दोन आरोपींच्या मुसक्या...

सिंदेवाहीत माकडांची दहशत कायम; दोन दिवसांत दोन जणांवर हल्ले,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही शहरात माकडांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच चालला असून दोन दिवसांत दोन नागरिकांवर हल्ले झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे वनविभागाने...

राज्यात ‘किलकारी’ उपक्रमात वर्धा पहिल्या,चंद्रपूर दुसऱ्या,वाशीम तिसऱ्या तर गडचिरोली चौथ्या स्थानावर..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत गरोदर माता,माता आणि बालकांच्या आरोग्याविषयी डिजिटल साक्षरता व जनजागृती करणाऱ्या ‘किलकारी’(Kilkari Mobile Audio Services)उपक्रमात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!