- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
आरमोरी(गडचिरोली):-शेतात निंदणी करण्यासाठी गेलेल्या महिलांवर वीज कोसळल्याने एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर ११ महिला जखमी झाल्याची घटना काल,शुक्रवारी २० सप्टेंबरच्या दुपारी २ वाजताच्या सुमारास आरमोरी तालुक्यातील डार्ली येथे घडली.विजया विलास गेडाम वय ४० वर्षे,रा. नरोटीमाल असे मृत महिलेचे नाव आहे.
डार्ली येथील केशव लाकडे यांच्या शेतात निंदा काढण्यासाठी नरोटीमाल येथील ११ महिला नेहमीप्रमाणे शेतात गेल्या होत्या.एकाएक वातावरणात बदल होऊन विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली.पावसापासून बचाव करण्यासाठी महिलांनी शेताला लागून असलेल्या नागोबा मंदिरात आसरा घेतला.सदर महिला मंदिराच्या गेटजवळ उभ्या असताना वीज कोसळली. या विजेच्या धक्क्याने विजया गेडाम यांचा जागीच मृत्यू झाला.तर ११ महिला जखमी झाल्या.यातील सरिता सरावन मडावी वय ५५ वर्षे व संगीता प्रमोद गेडाम वय २३ वर्षे या गंभीर जखमींना उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.तर ९ किरकोळ जखमी महिलांना प्राथमिक आरोग्य केंद्र वडधा येथे उपचार सुरू आहे.कधीही वातावरणात बदल होऊन मोठ्याप्रमाणा वीज पडून मनुष्यहानीच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.घटनेची माहिती प्राप्त होताच आरमोरी पोलिसांनी घटनास्थळ गाठित पंचनामा केला.मृतक महिलेचे मृतदेह शवविच्छेदनासाठी आरमोरी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले असून,पुढील तपास आरमोरी पोलिस करीत आहेत.
- Advertisement -

