- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-नकली नोटा तयार करून चलनात आणू पाहणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मोठे यश आले आहे.शहरातील एका फ्लॅटवर टाकलेल्या धाडीत ५०० रुपयांचे तब्बल १० खोके नकली नोटांसह इतर साहित्य असे मिळून ९१ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून टोळीतील एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. शुभम दिनेश नागर वय २६ वर्षे,रा.पंचेड,ता.जि.रतलाम, मध्यप्रदेश असे अटकेतील आरोपीचे नाव असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,चंद्रपूर शहराच्या उर्जानगर मेजर गेटजवळील राजश्री अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक-२०३ मध्ये अज्ञात इसम ५०० रुपयांच्या नकली नोटांची छपाई करीत असल्याची गोपनीय माहिती काल मंगळवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली होती.माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाड टाकली.फ्लॅट बंद असल्याने चंद्रपूर शहराच्या बंगाली कॅम्प येथील फ्लॅटचे मालक सुमित पॉल यांची विचारणा केली असता सदरचा फ्लॅट मागील महिनाभरापासून मध्यप्रदेशातील काही व्यक्तींना किरायाने दिल्याचे सांगितले.गुन्हे शाखेच्या पथकाने क्षणाचाही विलंब न करता पंचासमक्ष फ्लॅटचे कुलूप तोडले.आत जाऊन झडती घेतली असता खोलीतील बेडरूममध्ये ५०० रुपयांच्या नकली नोटांची १० खोके, एक कलर प्रिंटर व इतर साहित्य असे मिळून ९१ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीच्या मुसक्या आवळून अन्य आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.आरोपी विरोधात दुर्गापूर पोलीस ठाण्यात
भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१८(२), ३१८(३),३३६(२),३३६(३) व १८२(१) अन्वये अपराध क्रमांक १९६/२०२६ नोंद करण्यात आला असून पुढील तपास दुर्गापूर पोलीस प्रशासन करीत आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली एसडीपीओ प्रमोद चौगुले,परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक गौरव कायंदे पाटील,दुर्गापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कांकरेडवार,बलराम झाडोकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष निंभोरकर,सर्वेश बेलसरे, सुनील गौरकार यांच्यासह पोलीस कर्मचारी जयसिंग, सचिन गुरनुले,संतोष येलपूलवार,गणेश मोहुर्ले,नितीन रायपूरे, रजनीकांत पुट्टावार,किशोर वकाटे,अजित शेंडे, चालक दिनेश अराडे,प्रमोद डंभारे तसेच महिला पोलीस कर्मचारी निराशा तितरे,विजयमाला वाघमारे,छाया निकोडे,अपर्णा मानकर,दिपिका सोडनार,उषा लेडांगे यांच्या पथकाने केली.
- Advertisement -

