Saturday, September 5, 2026
Homeचंद्रपूरफेसबुक मैत्री महागात; विवाहित महिलेवर अत्याचार..

फेसबुक मैत्री महागात; विवाहित महिलेवर अत्याचार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या वरोरा तालुक्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.एका विवाहित महिलेची २५ वर्षीय तरुणाशी सोशल मीडियाच्या माध्यमातून पहिल्यांदा ओळख झाली. ओळखीची सुरुवात ‘हाय, हॅलो’ व नंतर त्रास देत ब्लॅकमेलिंग करून अत्याचारावर पोहचली.पीडित महिला काल शनिवारी पोलीस ठाण्यात गेल्याने प्रकरणास वाचा फुटली.महिलेने दिलेल्या तक्रारीवरून २५ वर्षीय अभिजित प्रभाकर कुडे रा.उखर्डा,ता.वरोरा, जि.चंद्रपूर याचेवर वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या स्थितीत फेसबुकवरील मॅसेंजरवर मैत्री करण्याचे प्रमाण वाढलेले दिसून येते.फेसबुक मॅसेंजरवरील मॅसेज गोपनीय न राहता फ्रेंड लिस्टमध्ये असलेल्या इतरांना सहजरीत्या वाचता येते.त्यामुळे कोणतेही सोशल मीडियाचे अकाऊंट वापरतांना खबरदारी घेणे आवश्यक आहे.अश्याच प्रकारे एका विवाहित महिलेची अभिजित कुडे नामक तरुणाशी फेसबुकवर मैत्री झाली.मैत्रीच्या नात्याने दोघांमध्ये मॅसेज करणे व नंतर मोबाईलवर संभाषण सुरू झाले.महिला भोळ्या पणात गेली. आरोपीने त्याच वेळेस काल रेकॉर्ड करणे व मॅसेजचे स्क्रीनशॉट काढून ठेवायला सुरुवात केली.काही दिवसानंतर महिला मंदिरात गेली असता आरोपीने हात धरून विनयभंग केला.हिंगणघाट येथे लॉजवर नेऊन अत्याचार केला. काही दिवसांनी आरोपीने खरी रंगदारी दाखवायला सुरुवात केली.स्वतःकडील काल रेकॉर्ड व मॅसेज महिलेच्या पतीला दाखविण्याची धमकी देत बळजबरी करू लागला.त्यानंतर आरोपीने महिलेला त्रास देणे सुरू केले.त्रास सहन न झाल्याने शेवटी पिडीत महिलेने वरोरा पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. आरोपीस गुन्हा दाखल झाल्याची भनक लागताच फरार झाला.वरोरा पोलीस आरोपीच्या मागावर असून लवकरच आरोपीस बेड्या ठोकल्या जाणार,असे वरोरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार अजिंक्य तांबडे यांनी स्पष्ट केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

‘या’ उमेदवारांना मिळणार मुलाखतीची तयारी करण्यासाठी १० हजाराचे आर्थिक सहाय्य..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा-२०२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांना मुलाखतीची तयारी करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व...

सतर्कता बाळगा..! नुकसानभरपाईच्या बहाण्याने शेतकऱ्यांकडून घेतले आधार कार्ड,पॅन कार्ड आणि सातबारे उतारे.. – अन् उचलले ७३ कोटींहून अधिकचे कर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-भोळ्या-भाबड्या,गरीब आणि अल्पशिक्षित शेतकऱ्यांना सरकारी योजनेअंतर्गत दरवर्षी दहा हजारांची नुकसाभरपाईची मदत मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांची कागदपत्रे मिळवली आणि त्यांच्याच नावावर...

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!