Sunday, September 6, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तपोलीसच निघाला मास्टरमाईंड; ५०० आणि २०० रुपयांच्या नकली नोटांसह १ कोटी ११...

पोलीसच निघाला मास्टरमाईंड; ५०० आणि २०० रुपयांच्या नकली नोटांसह १ कोटी ११ लाख रुपयांचा ऐवज जप्त..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-सांगली जिल्ह्याच्या मिरज शहरात  खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असतांनाच नकली नोटा छपाई करून चलनात आणणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे.मात्र,टोळीचा म्होरक्या दुसरा कुणी नसून चक्क पोलीस दलातीलच वाहनचालक हवालदार निघाल्याने पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे.प्रकरणी कोल्हापूर पोलीस दलातील मुख्य सूत्रधार वाहनचालक पोलीस हवालदार इब्रार आदम इनामदार वय ४४ वर्षे,रा.कसबा बावडा,सुप्रीत काडापा देसाई रा.गडहिंग्लज,राहुल राजाराम जाधव वय ३३ वर्षे, कोरोची,नरेंद्र जगन्नाथ शिंदे वय ४० वर्षे,टाकाळा,सिद्धेश जगदीश म्हात्रे वय ३८ वर्षे,रा.मालाड पूर्व,मुंबई अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून सर्वांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सर्वांना १३ ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी आरोपींकडून ५०० आणि २०० रुपयांच्या बनावट नोटा,कलर झेरॉक्स मशीन,स्कॅनर-प्रिंटर आणि एक वाहन असा एकूण १ कोटी ११ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.मिरज शहर पोलिसांना,मिरज-पंढरपूर रस्त्यावरील नीलजी बामणी पुलाखाली बनावट नोटांची विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार,पोलिसांनी सापळा रचून सुप्रीत काडापा देसाई या आरोपीस ४२ हजार रुपयांच्या नकली नोटांसह ताब्यात घेतल्याने नकली नोटा छपाई करून चलनात आणणाऱ्या टोळीचा भांडाफोड झाला.विशेष म्हणजे, मुख्य आरोपी इनामदार ५०० रुपयाच्या बदल्यात तीन नकली नोटा द्यायचा.प्रकरणी आरोपींनी नकली नोटा कुठे-कुठे वाटल्या व अन्य टोळीचा यात सहभाग असण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याने त्या दिशेने पुढील तपास सुरू असल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप घुगे यांनी पत्रकार परिषदेत माहिती देतांना स्पष्ट केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

तलावात मासे पकडत असतांनाच पाय घसरल्याने तलावात पडला; चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू.. -दुसऱ्या घटनेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निलज गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत गाव नजीकच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या...

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!