Monday, July 13, 2026
Homeगोंदियाचक्क शहरालगत वाघाचे दर्शन; वाघ जेरबंद..!

चक्क शहरालगत वाघाचे दर्शन; वाघ जेरबंद..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-मध्यरात्रीच्या सुमारास एका पट्टेदार वाघाचे दर्शन झाल्याने परिसरातील नागरिकांची काहीकाळ तारांबळ उडून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.लागलीच वन विभागास माहिती देत वाघाला जेरबंद करण्यात आले.सदरची घटना शनिवारीच्या मध्यरात्री गोंदिया शहराच्या फुलचूर परिसरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागील भागात उघडकीस आली.
गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागील भागात  झुडपी जंगल असून परिसर शहराबाहेर नाल्यालगत लागून आहे.याच परिसरात जिल्हाधिकारी,जिल्हा पोलिस अधीक्षक तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांची वसाहत आहे.काल शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास काही नागरिकांना वसाहतीस लागून असलेल्या झुडपी जंगल परिसरात एक पट्टेदार वाघ फिरतांना दिसून आला. सदरची माहिती परिसरातील नागरिकांना होताच बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.त्यानंतर याबाबतची माहिती वन विभाग व पोलीस प्रशासनास मिळताच घटनास्थळी दाखल होत वन विभागाचे रेस्क्यू पथकास पाचारण करण्यात आले.रेस्क्यू पथकाने काही तासांतच वाघाला बेशुद्ध करून जेरबंद केल्याने परिसरातील नागरिक भयमुक्त झाले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!