Saturday, August 8, 2026
Homeचंद्रपूरप्रेमविवाह केला आणि मुलीच्या घरासमोरूनच फटाके फोडत काढली लग्नाची मिरवणूक.. - वादंग...

प्रेमविवाह केला आणि मुलीच्या घरासमोरूनच फटाके फोडत काढली लग्नाची मिरवणूक.. – वादंग निर्माण होऊन दोन कुटूंबीयांत हाणामारी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :-तरुणाचे गावातीलच तरुणीशी सुत जुळले. दोघेही गावातून पळून गेले.त्यानुसार कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.पोलिसांनी दोघांनाही शोधून काढत मुलीला विचारणा केली असता तरुणाशी लग्न करण्यास संमती दर्शविली.लग्न तर केले,मात्र मुलीच्या घरासमोरूनच लग्नाची मिरवणूक काढत फटाके असतांना वादंग निर्माण झाल्याने दोन्ही बाजूंमध्ये हाणामारी आणि काठ्यांनी मारहाण सुरू झाली. सदरची घटना चंद्रपूर जिल्ह्याच्या कोरपना तालुक्यातील गांधीनगरमध्ये लग्नाच्या दिवशी म्हणजेच रविवारी सायंकाळी साडे सात वाजताच्या सुमारास घडली.प्रकरणी कोरपना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.गांधीनगरचा रवी बंडू बुटले यांचे त्याच गावातील १९ वर्षीय शिवानी राऊतशी प्रेमसंबंध होते.दोघेही बारा दिवसांपूर्वी गावातून पळून गेले होते.पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली तेव्हा पोलिसांनी दोघांनाही शोधून काढले.शिवानीने पोलिसांसमोर रवीशी लग्न करण्यास संमती दर्शविली आणि दोन दिवसांपूर्वी रविवारी त्यांचे लग्न झाले. परंतु,शिवानीच्या कुटुंबाला या लग्नाला मान्यता नव्हती आणि तिच्या कुटुंबातील एकही सदस्य लग्नाला उपस्थित नव्हता.लग्नानंतर सायंकाळी साडे सात वाजता शिवानीच्या घरासमोर लग्नाची मिरवणूक निघत होती.शिवानीच्या घरासमोर लग्नाच्या वेळी फटाके फोडले,नाचले आणि गाणी गायली तेव्हा शिवानीच्या कुटुंबाला राग आला आणि दोन्ही कुटूंबीयांमध्ये हाणामारी आणि काठ्यांनी मारहाण सुरू झाली.घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला.परंतु,दोन्ही कुटूंबीय ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याने कोरपना पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

एकेकाळी ज्या भागात फडकायचे लाल,काळे झेंडे; आता पहिल्यांदाच फडकणार तिरंगा..

उद्रेक न्युज वृत्त :-देशातील नक्षलवादाची संपूर्ण मुळे ३१ मार्च २०२६ पर्यंत उपटून फेकण्यात येणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर करताच राज्याच्या विविध जिल्ह्यातील...

महागाईची झळ; दुग्धजन्य पदार्थांच्या किंमतीसह दूध विक्रीत होणार वाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-अगोदरच महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलेले असतांनाच आता त्यात आणखी भर पडून दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिकांनी दूध विक्रीच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांची...

गडचिरोलीची बदनामी करण्याचा डाव; नागरिकांनी तथ्य पडताळूनच माहिती शेअर करावी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था आणि रस्त्यांच्या स्थितीबाबत जुनी, वस्तुस्थितीशी विसंगत तसेच अन्य राज्यांतील छायाचित्रे गडचिरोलीतील असल्याचे भासवून...

शिक्षण सेवक व शिक्षक पदभरती प्रक्रियेस सुरुवात; राज्यात ३० हजार २०९ रिक्त पदांची भरती..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 'पवित्र पोर्टल'द्वारे शिक्षण सेवक आणि शिक्षक पदभरतीची कार्यवाही सुरू करण्यात आली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!