Saturday, August 8, 2026
Homeगडचिरोलीचालत्या ट्रॅक्टरवरून पडल्याने २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू..

चालत्या ट्रॅक्टरवरून पडल्याने २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील दर्पणगुडा गावावरून घोटकडे ट्रॅक्टरवर बसून जात असतांना वाटेतच ट्रॅक्टरवरून तोल गेला.तोल जाताच  खाली पडल्याने चालत्या ट्रॅक्टरचे चाक डोक्यावरून गेल्याने २६ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना काल सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली. अपघातात घोट येथील नीलेश दीपक सुरजागडे याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.घोट व परिसरातील रस्ते जड वाहतुकीमुळे खराब होऊन खड्डेमय झाले आहेत. एखादे वाहन वेगात पळवतो म्हटले तर आदळून-आपटून जीवघेणा प्रवास करावा लागतो आहे. अश्यातच काल सोमवारी सायंकाळच्या सुमारास ट्रॅक्टर चालक रितीक वैरागडे व बाजूला बसलेला नीलेश सुरजागडे हे दोघेही ट्रॅक्टर क्रमांक-एमएच ३३ एफ ४११३ ने  दर्पणगुडा गावावरून घोटकडे जात होते.जात असतांनाच वेगात असलेल्या ट्रॅक्टरवरून चालकाच्या बाजूला बसलेल्या नीलेशचा तोल गेला.तोल जाताच तो खाली पडला.खाली पडताच ट्रॅक्टरचे चाक त्याच्या डोक्यावरून गेल्याने तो जागीच ठार झाला.घटना घडताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मोठी गर्दी केली.घोट पोलिसांनी घटनास्थळ गाठत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल केला.घटनेनंतर नातेवाईकांना माहिती देताच त्यांनी रुग्णालयात धाव घेत नीलेशचा मृतदेह पाहून एकच हंबरडा फोडला.मयत नीलेशचे वडील दीपक सुरजागडे यांच्या तोंडी फिर्यादीवरून घोट पोलीस मदत केंद्रात गुन्हाची नोंद करण्यात आली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

एकेकाळी ज्या भागात फडकायचे लाल,काळे झेंडे; आता पहिल्यांदाच फडकणार तिरंगा..

उद्रेक न्युज वृत्त :-देशातील नक्षलवादाची संपूर्ण मुळे ३१ मार्च २०२६ पर्यंत उपटून फेकण्यात येणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर करताच राज्याच्या विविध जिल्ह्यातील...

महागाईची झळ; दुग्धजन्य पदार्थांच्या किंमतीसह दूध विक्रीत होणार वाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-अगोदरच महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलेले असतांनाच आता त्यात आणखी भर पडून दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिकांनी दूध विक्रीच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांची...

गडचिरोलीची बदनामी करण्याचा डाव; नागरिकांनी तथ्य पडताळूनच माहिती शेअर करावी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था आणि रस्त्यांच्या स्थितीबाबत जुनी, वस्तुस्थितीशी विसंगत तसेच अन्य राज्यांतील छायाचित्रे गडचिरोलीतील असल्याचे भासवून...

शिक्षण सेवक व शिक्षक पदभरती प्रक्रियेस सुरुवात; राज्यात ३० हजार २०९ रिक्त पदांची भरती..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 'पवित्र पोर्टल'द्वारे शिक्षण सेवक आणि शिक्षक पदभरतीची कार्यवाही सुरू करण्यात आली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!