Monday, August 10, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली शहरात अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ; टोळीत दोन तरुण व दोन मुलींचा समावेश..

गडचिरोली शहरात अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ; टोळीत दोन तरुण व दोन मुलींचा समावेश..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-शहरात अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत चामोर्शी मार्गावरील एक फार्मसी व एक बेकरी तर धानोरा मार्गावरील एका रेस्टॉरंटमध्ये धाडसी चोऱ्या करीत चोरी करणाऱ्यांच्या टोळीत दोन तरुण मुले व दोन मुलींचा समावेश असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आढळून आले आहे.विशेष म्हणजे,चोरट्यांनी चेहरा स्कार्फने पूर्ण झाकला असल्याने त्यांची ओळख पटवणे कठीण झाले आहे.दहा दिवसांपूर्वी गोकुलनगर येथील गणेश कॉलनीमध्ये दोन घरांचे कुलूप तोडून चोरी करण्यात आली होती.तसेच गुजरी परिसरातही चोरी झाल्याने चोरीच्या घटनांमुळे शहरामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.अशातच नुकतेच शहरातील चामोर्शी महामार्गावरील डॉ.कुंभारे यांच्या धन्वंतरी हॉस्पिटलच्या बाजूला असलेल्या स्मार्ट केअर फार्मसी मेडिकल शॉपमध्ये चोरी झाल्याची घटना काल सोमवारी उघडकीस आली.चोरट्यांनी या औषधालयाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.प्रवेश करून ड्राव्हरमधील नगदी रक्कम घेऊन पसार झाल्याची घटना पहाटे ३ वाजताच्या दरम्यान घडली.विशेष म्हणजे,याच दरम्यान धानोरा मार्गावरील साई वृंदावन रेस्टॉरंटमध्येही चोरट्यांनी कुलून तोडून प्रवेश केला.येथेही काऊंटरमधील रक्कम घेऊन ते पासर झाले.त्यातही आदल्या दिवशीच मध्यरात्री चामोर्शी मार्गावरीलच वडेट्टीवार कॉम्प्लेक्समधील कृष्णा बेकरी येथेही पहाटेच्या सुमारास कुलूप तोडून चोरट्यांनी चोरी केली होती. चोरीच्या घटनांमुळे शहरवासिय धास्तावले असून पोलीस प्रशासनाने अज्ञात चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा,अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंजच्या शंकरपूर येथे जागतिक आदिवासी दिन साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या  आदिवासी गोंड गोवारी समाज संघटना शाखा शंकरपूर यांच्या वतीने आज,रविवार ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन...

आता गौण खनिजांच्या अवैध उत्खनन व वाहतुकीवर आकारला जाणार दहापट दंड..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गौण खनिजांच्या अवैध उत्खनन व वाहतुकीला प्रभावी आळा घालण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता,१९६६ मधील कलम ४८(७)मध्ये सुधारणा करण्यास मंगळवार २८ जुलै...

धावपट्टीवरून घसरला विमान; अजित पवारांच्या आठवणी ताज्या..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-जिल्ह्याच्या बारामती एअरफिल्डवर प्रशिक्षण सरावादरम्यान एक ट्रेनर विमान धावपट्टीवरून घसरल्याची घटना आज,रविवार ९ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घडल्याने एकच खळबळ उडाली...

पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यात पोलिसांना यश..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याच्या दाखल गुन्ह्यात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी व तिच्यासोबत असलेल्या संशयित आरोपीचा शोध घेण्यात अनैतिक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!