- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):देसाईगंज तालुक्यातील
पूरबाधित नुकसानग्रस्त शेतकरी बऱ्याच महिन्यांपासून अजूनही आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेतच असल्याने आता हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने तरी भरपाई मिळणार कां?असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.शेतकऱ्यांनी खरीप हंगामात धान पिकांची लागवड केली.नद्यांना आलेल्या पुराचे पाणी धानाचे पिकात शिरल्याने मोठ्या प्रमाणावर धान पिकांचे नुकसान झाले.असे असले तरी काही पीक जिवंत करण्याचे प्रयत्न शेतकऱ्यांनी केले.त्यातही प्रचंड खर्च आला.एकीकडे नुकसान तर दुसरीकडे उत्पादन खर्च जास्त झाले.त्यामुळे दोन्ही बाजुंनी नुकसानाची झळ पोहचली.परंतु,नुकसानग्रस्त पूरबाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली नसल्याने देसाईगंज तालुक्याच्या परिसरातील शेतकरी आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.
हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने नागपुरात राज्याचे मंत्रिमंडळ आले आहे.शेतकऱ्यांना जलद गतीने न्याय मिळण्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत.देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा,कुरुड,आमगाव,विर्शी,सावंगी
परिसरातील वैनगंगा नदीला पावसाळ्यात पुर येऊन पुराचे पाणी शेतात शिरल्याने धान पिकांचे पिक प्रचंड नुकसान झाले.अनेक हेक्टर आर.शेतात धान पिकाची तणस झाली असल्याचे बघायला मिळाले.नदीच्या काठाचे शेजारी असणाऱ्या गावातील शेतीतील धानाचे नुकसानग्रस्त पीक सरसकट घेण्यात आले.तर काही अंतरावरील गावात नाल्याचे लगत असणाऱ्या शेतीतील धान पिकांचा समावेश करण्यात आला आहे.विधानसभा निवडणुकीच्या आधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या शासनास सादर केलेल्या आहेत. निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच शेतकऱ्यांच्या याद्यांवर अंमलबजावणी करण्यात आली नाही.याच कालावधीत अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात आली.त्यांची दुसऱ्या यादीची आर्थिक मदत अडली आहे.अशातच पूरग्रस्त शेतकऱ्याचे बचत खात्यात आर्थिक मदत जमा करण्यात आली नाही.परत सप्टेंबर २०२४ च्या नुकसान भरपाईचा थांगपत्ता दिसून येत नसल्याने शेतकऱ्यांचे चेहरे हिरमुसले आहेत.
- Advertisement -

