Wednesday, September 2, 2026
Homeनागपूरपाच मित्र तलाव परिसरात फिरायला गेले अन् दोघेजण बुडाले..!

पाच मित्र तलाव परिसरात फिरायला गेले अन् दोघेजण बुडाले..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-तलाव परिसरात पाच मित्र फिरायला गेले,पण त्यातील दोघेजण पाण्यात उतरताच ओरडू लागल्याने तिघांची घाबरगुंडी झाली.अश्यातच आरडाओरड केल्याने स्थानिक नागरिकांनी धाव घेत घटनेची माहिती पोलिसांना दिली.त्यानुसार दोघांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याचे काल,शनिवारी पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आले.सदरची घटना नागपूरच्या गोरेवाडा तलाव परिसरात घडली.यात १८ वर्षीय सतीश रामराज देशभ्रतार आणि १८ वर्षीय अनिकेत धनराज बडगे दोघेही भद्रशीला बुद्ध‌विहाराजवळ,टीव्ही टॉवर, मानवतानगर,नागपूर येथील रहिवासी असून दोघांचाही तलावात बुडून मृत्यू झाला.सतीश हा पेंटिंगचे काम करायचा व त्याचे वडील ई-रिक्षा चालवतात तर अनिकेत हा एका खाजगी रुग्णालयात काम करीत होता.
माहितीनुसार,सतीश देशभ्रतार,अनिकेत बडगे,२१ वर्षीय साहिल चौरे,१७ वर्षीय यश उके आणि १३ वर्षीय कुणाल उके हे पाच मित्र काल शनिवारी दुपारच्या सुमारास नागपूरच्या गोरेवाडा तलाव परिसरात फिरायला गेले होते.त्यातच तिघेजण तलावाच्या काठावर सेल्फी काढत होते.तर सतीश आणि अनिकेत हे तलावात पोहण्यासाठी उतरले.पोहता-पोहता दोघेही खोल पाण्यात गेल्याने गटांगळ्या खात ओरडू लागले.त्यामुळे साहिल चौरे, यश उके आणि कुणाल उके हे तिघेही घाबरले.घाबरतच तिघेही तलाव परिसराच्या बाहेर निघून याबाबत नागरिकांना माहिती दिली.काही नागरिकांनी याबाबत गिट्टीखदान पोलिसांना कळविले.
गिट्टीखदान ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कैलाश देशमाने ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले.सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास महापालिकेच्या अग्निशमन विभागाला सूचना दिली.सिव्हिल लाईन्सच्या अग्निशमन विभागाचे वाहन घटनास्थळी पोहोचल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी बोटीच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली. दरम्यान,अग्निशमन विभागाने रात्री उशिरापर्यंत शोध घेतला असता,रात्री ११ वाजताच्या सुमारास सतीशचा मृतदेह सापडला.रात्र झाल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली व परत आज,रविवार शोधमोहीम राबवली असता सकाळच्या सुमारास अनिकेतचा मृतदेह सापडला.घटनेने मानवतानगरात शोककळा पसरली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!