- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यातील
आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावरील तमनदाला फाटा ते अमडेली हा एक किलोमीटरचा गिट्टी टाकून बनविलेला रस्ता वनकायद्यावर बोट ठेवत चक्क भाड्याने ट्रॅक्टर लावून सिरोंचा वनविभागाने नांगरून उद्ध्वस्त केला होता.यानंतर कंत्राटदाराने गडचिरोलीचे सहपालकमंत्री ॲड.जयस्वाल यांच्याकडे धाव घेतली.ॲड.जयस्वाल यांनी ही बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली होती.त्यातच ६ जून रोजी मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर असतांना आढावा बैठकीत उपवनसंरक्षक पूनम पाटे यांना सुनावले होते. ‘वनाधिकाऱ्यांचा दहशतवाद खपवून घेणार नाही,थेट घरी पाठविणार,’ अशा कठोर शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते.त्यानंतर आता वनकायद्याच्या नावाखाली कामे अडविणाऱ्या वनाधिकाऱ्यांना अद्दल घडवून अखेर वनपरिक्षेत्राधिकारी सुधीर सुरपाम यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
- Advertisement -

