Sunday, April 19, 2026
Homeगडचिरोलीसाधी रेल्वेही न पाहिलेले गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थी 'इस्रो' ला रवाना..!

साधी रेल्वेही न पाहिलेले गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थी ‘इस्रो’ ला रवाना..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम, नक्षलग्रस्त भागातील आणि आर्थिक मागास कुटुंबांमधील विद्यार्थ्यांसाठी आज,रविवार १५ जून हा दिवस ऐतिहासिक ठरला आहे.समाज कल्याण विभागाच्या सिरोंचा,वांगेपल्ली (अहेरी) आणि नवेगाव (गडचिरोली) येथील निवासी शाळांमधील १२० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी विमानप्रवासाद्वारे बंगळूरु येथील इस्रो (ISRO) केंद्राला भेट देण्यासाठी उड्डाण केली.विशेष म्हणजे,यातील अनेक विद्यार्थ्यांनी यापूर्वी साधी रेल्वेही पाहिली नव्हती किंवा जिल्ह्याचे मुख्यालयही पाहिले नव्हते.त्यांच्या या स्वप्नवत प्रवासाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर येथे उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत ते कुठे जात आहेत,कसे जाणार आहेत आणि काय पाहणार आहेत,असे आपुलकीने विचारले.त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत “मुलांनो,खूप खूप अभ्यास करा आणि यशस्वी व्हा,” या शब्दात प्रेरित केले.
  • आदिवासी विकास मंत्री आणि इतर मान्यवरांकडूनही शुभेच्छा👇
आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके आणि गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांनीही विमानतळावर उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
  • डॉ.सचिन मडावी यांच्या संकल्पनेतून साकारली योजना👇
या अभिनव उपक्रमाची संकल्पना सहाय्यक आयुक्त (समाजकल्याण) डॉ.सचिन मडावी यांनी मांडली होती.जिल्हाधिकारी पंडा यांनी त्यास तात्काळ मंजुरी दिली.तसेच पालकमंत्री देवेंद्र फडणवीस व सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी या योजनेसाठी निधी मंजूर केला.
तत्पुर्वी गडचिरोली येथून या विद्यार्थ्यांना बसद्वारे हिरवी झेंडी दाखवून नागपूर विमानतळावर रवाना करण्यात आले.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे,निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सुर्यवंशी,प्रकल्प अधिकारी चेतन हीवंज या प्रसंगी उपस्थित होते.विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील या अविस्मरणीय क्षणाला त्यांच्या पालकांच्या डोळ्यांतही आनंदाश्रू पाहायला मिळाले.
  •                   इस्रो (ISRO)👇
भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रो(ISRO)ही भारत सरकारची राष्ट्रीय अवकाश संस्था असून,उपग्रह,रॉकेट आणि अवकाश तंत्रज्ञान विकासासाठी कार्यरत आहे.जगभरात भारतीय अंतराळ प्रगतीचे प्रतीक म्हणून इस्रोची ओळख आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाहनधारकांसाठी दिलासा; गडचिरोली शहरातील ट्रॅफिक सिग्नल काही वेळासाठी राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातीलच नव्हे तर राज्याच्या विविध जिल्ह्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जीवाची लाहीलाही होत आहे.अश्यातच शहरातील महत्त्वाच्या...

उष्णतेची तीव्रता; प्रखर उन्हामुळे शेतातच पडली बेशुद्ध.. – शेतकरी महिलेचा मृत्यू; नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उष्णतेचा पारा चढल्याने आरोग्य विभागासह प्रशासन सतर्क झाले आहे.त्यातच,नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.विशेष म्हणजे,दुपारी १२...

कहाणीमध्ये ट्विस्ट.! ना वाघ ना बिबट्या; घातपाताचा संशय.. – जंगल परिसरात महिलेचा मृतदेह आढळल्याचे प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीट एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

पोलिसांच्या एका चुकीमुळे गडचिरोली हत्या प्रकरणातील ‘त्या’ आरोपीस मिळाला जामीन..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सात वर्षावरील गुन्हे दाखल असलेल्या आरोपीस पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला चोवीस तासांच्या आत न्यायालयातील न्याय दंडाधिकारी यांच्या समक्ष हजर करावे लागते.त्यानुसार,न्यायालय...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!