Thursday, September 24, 2026
Homeभंडारापरवानगी न घेता शाळा चालविणे दोन संस्था चालकांना पडले महागात... - संस्था...

परवानगी न घेता शाळा चालविणे दोन संस्था चालकांना पडले महागात… – संस्था चालकांवर गुन्हा दाखल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-शासन परवानगी तसेच मान्यतापत्राशिवाय अनधिकृतपणे सुरू असणाऱ्या शाळांविरुद्ध बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम-२००९ मधील कलम १८ नुसार लाखांदूर शहरातील दोन संस्थांच्या शाळा संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.काल,सोमवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास लाखांदूर पोलिसांनी दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलचे पद्मशील रामचंद्र ढाले (औरंगाबाद) यांच्यासह ट्विंकल स्टार स्कूलचे संचालक नागेश शामराव रामटेके यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
लाखांदूर तालुक्यात शैक्षणिक सत्र २०२४-२५ मध्ये दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल व ट्विंकल स्टार स्कूल या दोन शाळा अनधिकृतपणे चालविले जात असल्याचे आढळून आले.यापूर्वीच्या शैक्षणिक क्षेत्रांमध्ये देखील या शाळा अनधिकृतपणे चालवत असल्याचे शिक्षण विभागाच्या निदर्शनास आले होते.वारंवार पत्रव्यवहार करून देखील संबंधित संचालकांनी या अनधिकृत शाळा बंद केल्या नाही.अंबादे यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन्ही शाळा व्यवस्थापकांवर भारतीय न्याय संहितेचे कलम २२३ अन्वये गुन्हा दाखल केला असून,पुढील तपास ठाणेदार सचिन पवार करीत आहे.
२९ नोव्हेंबरला लाखांदूर येथील दि’ बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लाखांदूर व ट्विंकल स्टार स्कूल येथे पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी यांनी भेट दिली.दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल येथे १ ते ६ चे अनधिकृतपणे वर्ग भरत असून,त्यामध्ये ६९ विद्यार्थी शिकत असलेले आढळले.तर ट्विंकल स्टार स्कूलमध्ये १ ते ४ चे अनधिकृतपणे वर्ग भरत असून, त्यामध्ये ३१ विद्यार्थी अनधिकृतपणे शिक्षण घेत असल्याचे आढळून आले.याची दखल घेऊन गटशिक्षणाधिकारी तत्वराज अंबादे यांनी भंडारा जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या पत्रानुसार लाखांदूर पोलिसांत तक्रार दाखल केली.
शाळा चालवितांना शिक्षण विभागाची मान्यता घेणे आवश्यक असले तरी प्रशासनाच्या डोळ्यात धूळ झोकून हा प्रकार सुरू आहे.यामुळे पालकांची फसगत होत असल्याचे प्रकार आहेत.दहावीपर्यंत कसेबसे वर्ग चालवून बोर्ड परीक्षेसाठी केंद्र मिळवितांना मात्र संबंधितांची अडचण होत असते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुढील तीन तासात दोन जिल्ह्यात बरसणार जोरदार पाऊस; नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-उघडीप देणारा पाऊस कुठे जोरदार पडतो,तर कुठे एक थेंबही पडत नाही.निसर्गाचा लहरीपणा या वर्षी चांगलाच धडा शिकवायला लागल्याचे चित्र आहे.विशेष म्हणजे,काही...

निर्धारित ध्वनी मर्यादेचे उल्लंघन; डीजे मालक व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल.. – डीजे सह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम  सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा पवनपार येथील नवयुवक बाल गणेश मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत शासनाने प्रतिबंधित केलेल्या प्रेशर मिड(Pressure...

डुंबरसात्या आणण्यासाठी जंगल परिसरात गेलेल्या इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गावालगतच्या जंगल परिसरात 'डुंबरसात्या' म्हणजेच मशरूम आणण्यासाठी गेलेल्या एका ४५ वर्षीय इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना आज,गुरुवार २४ सप्टेंबर रोजी...

कुरुड,कोंढाळा,सावंगी व विसोरा गावातील रिक्त कोतवाल पद भरण्यास शासनाची मान्यता.. – महिला आरक्षण व रिक्त पदे भरण्याकरिता जातीचा प्रवर्ग निश्चित करण्यासाठी विशेष सभा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील कुरुड,कोंढाळा,सावंगी व विसोरा गावातील गेल्या अनेक कालावधीपासून रिक्त असलेले कोतवाल(महसुल सेवक)पद भरण्यास शासनाने मान्यता दिली असून संबंधित गावातील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!