Sunday, September 6, 2026
Homeभंडारापदाचा गैरवापर; तहसीलदार निलंबित...

पदाचा गैरवापर; तहसीलदार निलंबित…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-आदेश नसतांना शेती अकृषक परवानगीचे आदेश दिल्याप्रकरणी भंडाराच्या तहसीलदार विनीता लांजेवार यांना महसूल वनविभागाने निलंबित केले आहे.पदाचा गैरवापर केल्याने त्यांच्या विरोधात ही कारवाई करण्यात आली.या कालावधीत लांजेवार यांचे मुख्यालय भंडारा जिल्हाधिकारी कार्यालय असणार आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय लांजेवार यांना मुख्यालय सोडता येणार नाही. भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी लांजेवार यांची तक्रार केली होती.निलंबित होणाऱ्या लांजेवार या सलग दुसऱ्या तहसीलदार आहेत.यापूर्वी तहसीलदार हिंगेसुद्धा एका वेगळ्या प्रकरणात निलंबित झाले होते.पोलिस पाटलांच्या प्रकरणात त्यांना निलंबित करण्यात आले होते.हिंगेच्याही प्रकरणात आमदार भोंडेकर यांनीच तक्रार केली होती.त्यामुळे आता भंडाऱ्यात तहसीलदार म्हणून येण्यासाठी अधिकारी कचरत आहेत.आता भंडारा तहसीलदार पदावर धनंजय देशमुख येणार आहेत आणि सोमवारी ते आपला पदभार स्वीकारणार असल्याची माहिती आहे
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!