Saturday, August 29, 2026
Homeभंडारापत्नीचा विक्राळ रूप; 'तू माझ्याजवळ कां बसला नाहीस?' असे म्हणत चाकूने हल्ला..

पत्नीचा विक्राळ रूप; ‘तू माझ्याजवळ कां बसला नाहीस?’ असे म्हणत चाकूने हल्ला..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-अनेकदा पती हा पत्नीला बेदम मारहाण वा इतर हल्ले करून जखमी करतांना दिसून येतो.मात्र, भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यात एक आगळी-वेगळी घटना समोर आली आहे.सिनेमा(चित्रपट) पाहतांना पती जवळ बसला नाही म्हणून घरी जाताच पत्नीने विक्राळ रूप धारण करून ‘तू माझ्याजवळ कां बसला नाहीस?’ असे म्हणत पतीवर चक्क चाकूने हल्ला चढवून जखमी केल्याची घटना तुमसर तालुक्याच्या नाकाडोंगरी येथे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी घडली. पत्नीने केलेल्या हल्ल्यात आशिष मिश्रा यांच्या हाताला गंभीर जखम झाली आहे.प्रकरणी पत्नीवर गोबरवाही पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आशिष मिश्रा परिवारासह मित्रांसोबत ‘बॉर्डर २’ चित्रपट पाहण्यासाठी तुमसर येथे गेले होते.टॉकीजमध्ये गेल्यानंतर आशिष मिश्रा यांची पत्नी समोरच्या रांगेत बसली.तर आशिष मिश्रा हे मित्रांसोबत मागील रांगेत बसले.चित्रपट पाहतांना पत्नीने काहीही म्हटले नाही. मात्र,घरी जाताच पत्नीने पतीला, ‘तू माझ्याजवळ कां बसला नाहीस?’ यावरून पती सोबत वाद घालायला सुरुवात केली.वाद इतका विकोपाला गेला की,पत्नीने रागाच्या भरात घरातील चाकू काढून पती आशिष यांच्यावर हल्ला चढवला.चाकूचा वार आशिष यांच्या हातावर लागल्याने ते रक्तबंबाळ झाले. आशिष मिश्रा यांना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले.वेळीच उपचार मिळाल्याने मोठा अनर्थ टळला.लागलीच घटनेची माहिती गोबरवाही पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शरद शेवाळे यांना मिळताच त्यांनी पथकास तपास करून डॉक्टरांचा अहवाल मागविला व गोबरवाही पोलिस ठाण्यात पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.क्षुल्लकशा कारणावरून पत्नीने केलेल्या कृतीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सर्व अन्न विक्रेते व्यावसायिकांना परवाना घेणे बंधनकारक.. – पाणीपुरी पासून ते चहा विक्रेते व इतर परवाना नसणाऱ्यांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-अन्न व्यावसायिक विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम ३१ अंतर्गत परवाना घेणे किंवा नोंदणी प्रमाणपत्र घेणे...

नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणारे तब्बल १० सराईत गुन्हेगार तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलिस प्रशासन ॲक्शन मोडवर येत  नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या...

गरोदर मातेला नेले झोळीतून; घटनेनंतर प्रशासनाला आली जाग.. -आता कोईदूळ नाल्यावरील पुलाचा प्रश्न मार्गी लागणार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील कोईदूळ गावातील रहिवासी छाया सुरेश नैताम वय २६ वर्षे यांना आज,शुक्रवार २८ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास प्रसूती कळा सुरू...

सोशल मीडियावर जातीवाचक वक्तव्य करणे कराळे मास्तरला चांगलेच भोवले; अटक करून कारागृहात रवानगी..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-वर्ध्यातील 'फिनिक्स अकॅडमी'चे संचालक, सामाजिक कार्यकर्ते तथा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असलेले कराळे मास्तर यांना सोशल मीडियावर एका विशिष्ट समाजाविषयी जातीवाचक वक्तव्य...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!