Saturday, September 12, 2026
Homeभंडारापट्टेदार वाघाचा हल्ला; बोकड ठार तर एक शेळी जखमी...

पट्टेदार वाघाचा हल्ला; बोकड ठार तर एक शेळी जखमी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-राहत्या घरामागील सांजवाडीतून प्रवेश करून गोठ्यात शिरून बांधलेल्या एकूण २० शेळ्यांपैकी एका बोकडावर पट्टेदार वाघाने हल्ला करून ठार केले,तर एका शेळीला जखमी केल्याची घटना लाखनी तालुक्यातील किटाडी येथे शनिवारच्या रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली.यात पशुपालकाचे सुमारे दहा हजार रुपयांचे नुकसान झाले.वनविभागाकडून नुकसान भरपाईची मागणी नुकसानग्रस्त पशुपालक गोकुळ भोयर यांनी केली आहे.सायंकाळी शेळ्या व बोकड चराई करून आल्यानंतर त्यांना गोठ्यात बांधले होते.
रात्री ११ वाजता गोठ्यातील शेळ्या जोरजोराने ओरडू लागल्याने पशुपालक गोकुळ भोयर यांची झोपमोड झाली.गोठ्याकडे जाऊन पाहिले असता,पट्टेदार वाघाने एका बोकडाचा फडशा पाडल्याचे तर,एका शेळीला जखमी केल्याचे दिसून आले कुटुंबीयांना जागे करून मोठ्या हिमतीने स्वतः हातात काठी घेऊन वाघाला हुसकावून लावले.मात्र,वाघ दूर पळून न जाता त्यांच्या गोठ्याशेजारीलच सांजवाडीत त्याने काही वेळ ठिय्या दिला.माहिती मिळताच गावकरी मोठ्या संख्येने घटनास्थळी गोळा झाले.गावकऱ्यांनी आरडाओरड करून फटाके फोडताचा वाघाने धूम ठोकली.घटनास्थळी पट्टेदार वाघाचे पगमार्कही आढळून आले आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सासऱ्याने केला सुनेचा खून अन् स्वतःच मारली विहिरीत उडी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या यशोधरानगर पोलिस ठाणे हद्दीच्या पिवळी नदी परिसरातील पाहुणे ले-आऊटमध्ये एक खळबळ उडवणारी घटना आज,शनिवार १२ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस...

राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता; दोन दिवस पावसाचे..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.पुढील दोन दिवस राज्यातील विविध भागात पावसाची तीव्रता कायम राहणार...

नोकरीचे खोटे नियुक्तीपत्र दाखवून दोन महिलांची फसवणूक; दोघांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-मंत्रालयात चांगली ओळख असल्याची बतावणी करून सरकारी रुग्णालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत दोन महिलांची तब्बल १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा...

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!