Saturday, September 12, 2026
Homeभंडारापंचायत समितीत 'बोजारा' दिल्याशिवाय फाईल पुढे सरकतच नाही..! - आमसभेत 'बोजारा' शब्दाने...

पंचायत समितीत ‘बोजारा’ दिल्याशिवाय फाईल पुढे सरकतच नाही..! – आमसभेत ‘बोजारा’ शब्दाने अधिकाऱ्यांचे चेहरे ताणले गेले…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-अनेकदा आपण अनेकांच्या तोंडून
ऐकत असतो की,माझा ‘बोजारा राहिला बरं..!’ नेमका ‘बोजारा’ म्हणजे काय? ‘बोजारा’ हा शब्द ग्रामीण बोलीभाषेतून प्रचलित झाला असला,तरी तो प्रमाण मराठीत सापडत नाही.पारंपरिक सणांमध्ये,विशेषतः पोळा व होळी दरम्यान, ‘बोजारा’ म्हणजे भेटवस्तू वा पैशांची मागणी असा अर्थ घेतला जातो.अशातच भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी येथील पंचायत समितीच्या आमसभेत ‘बोजारा’ हा शब्द उपस्थितांच्या कानावर पडला अन् अनेकांचे चेहरे हास्याने फुलले व उपस्थित प्रतिनिधी खदखदायला लागले.मात्र, ‘बोजारा’ शब्दाने अधिकाऱ्यांचे चेहरे मात्र ताणले गेले.क्षणात चेहऱ्यांवरचा आनंदी भाव नाहीसा झाला.आमसभेत एका सदस्याने बोजारा दिल्याशिवाय फाईल पुढे सरकत नाही,असे म्हटले आणि प्रशासनामध्ये चालत असलेल्या ‘अर्थ’ कारणाची वास्तविकता समोर आली. यानंतर ‘बोजारा’ या शब्दाची चर्चा तालुक्यात सुरू झाली.त्यातच प्रशासनात कामे मार्गी लागण्यासाठी फायलींवर ‘वजन’ ठेवावे लागते, हीच ‘बोजारा’ शब्दाच्या वापरातील सूचकता आहे.पंचायत समितीच्या आमसभेत या शब्दाच्या उच्चाराने प्रशासनातील ‘अर्थ’ कारण उघड झाले आणि त्यावर तालुकाभर चर्चा रंगली आहे.आर्थिक वर्ष २०२४-२५ उद्या सोमवारी संपणार आहे.फायली सरकवायला वेग आला आहे.कामे पूर्णत्वास नेण्यासाठी प्रशासन गतिमान झाल्याचे दिसून येते.सरकारी कार्यालयांना तीन दिवस सुट्टी आहे.तथापि,फायलींचा पसारा दूर सारण्यासाठी अधिकारी सुट्टीतही कामाला लागले आहेत.अडलेल्या फायलींना पुढे ढकलण्यासाठी ‘बोजारा’ महत्त्वाचा ठरणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता; दोन दिवस पावसाचे..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.पुढील दोन दिवस राज्यातील विविध भागात पावसाची तीव्रता कायम राहणार...

नोकरीचे खोटे नियुक्तीपत्र दाखवून दोन महिलांची फसवणूक; दोघांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-मंत्रालयात चांगली ओळख असल्याची बतावणी करून सरकारी रुग्णालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत दोन महिलांची तब्बल १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा...

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

नैनपूरच्या महात्मा गांधी शाळेत तान्हा पोळ्याचा अनोखा सोहळा; विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची मने..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षणासोबत संस्कार, संस्कृतीसोबत सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,शुक्रवार ११...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!