Saturday, September 12, 2026
Homeगडचिरोलीप्राध्यापकाच्या वडिलाची नक्षलवाद्यांनी केली हत्या..

प्राध्यापकाच्या वडिलाची नक्षलवाद्यांनी केली हत्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-मोठा मुलगा प्राध्यापक तर लहान मुलगा वकील व सून पोलीस शिपाई असलेल्या इसमाची नक्षलवाद्यांनी गळा दाबून हत्या केल्याची घटना काल,शनिवार २९ मार्चच्या रात्री गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील धोडराज पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या जुव्वी गाव परिसरात घडून आज,रविवार ३० मार्च रोजी सर्वत्र उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे.पुसू गेब्बा पुंगाटी वय ६० वर्षे असे हत्या करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे.
माहितीनुसार,पुंगाटी कुटुंबीय काल शनिवारी जेवण करून झोपी गेले होते.अशातच रात्रीच्या सुमारास काही बंदूकधारी नक्षली जुव्वी गावात जाऊन पुसू पुंगाटी यांच्या घरी गेले.पुसू पुंगाटी यांना झोपेतून जागे करून गाव परिसर नजिक घेऊन गेले व पुसू यांना काही कळायच्या आतच नक्षलींनी त्यांची गळा दाबून  हत्या केली.घटनेबाबत कळताच कुटुंबीयांना मोठा हादरा बसला आहे.परत पुन्हा एकदा परिसरात नक्षलींची दहशत निर्माण झाल्याचे सदर प्रकारावरून दिसून येत आहे.पुसू पुंगाटी यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीला सामोरे जात दोन्ही मुलांना उच्चशिक्षित केले.त्यांना पत्नी आणि दोन विवाहित मुले असून मोठा मुलगा चिन्ना पुंगाटी हा एटापल्ली येथील राजे धर्मराव महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे.तर लहान मुलगा किशोर पुंगाटी हा अहेरी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात वकिली करतो. प्रा.चिन्ना पुंगाटी यांची पत्नी पोलिस शिपाई आहे.पुसू पुंगाटी यांची नक्षलींनी हत्या कां केली? नक्षलींनी केली की अन्य अज्ञात इसमांनी केली? याबाबत तपास सुरू असल्याचे गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी घटनेबाबत स्पष्ट केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सासऱ्याने केला सुनेचा खून अन् स्वतःच मारली विहिरीत उडी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या यशोधरानगर पोलिस ठाणे हद्दीच्या पिवळी नदी परिसरातील पाहुणे ले-आऊटमध्ये एक खळबळ उडवणारी घटना आज,शनिवार १२ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस...

राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता; दोन दिवस पावसाचे..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.पुढील दोन दिवस राज्यातील विविध भागात पावसाची तीव्रता कायम राहणार...

नोकरीचे खोटे नियुक्तीपत्र दाखवून दोन महिलांची फसवणूक; दोघांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-मंत्रालयात चांगली ओळख असल्याची बतावणी करून सरकारी रुग्णालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत दोन महिलांची तब्बल १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा...

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!