- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-सुरुवातीला मैत्री केली.मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.प्रेम बहरून आल्याने दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित केले.युवतीने लग्नाची अट घालताच तरुणाने काढता पाय घेतला.काढता पाय घेताच युवतीने पोलीस स्टेशन गाठले.युवतीच्या तक्रारीवरून भद्रावती पोलिसांनी काल,शनिवारी ५ एप्रिलला तरुणास अटक केली आहे.आशिष तुकाराम बारतीने वय २५ वर्षे,रा.चंदनखेडा असे आरोपी तरुणाचे नाव आहे.
माहितीनुसार, पिडीत युवती २१ वर्षाची असून चार वर्षांपूर्वी ती चंद्रपूर जिल्ह्याच्या भद्रावती येथे काही कामानिमित्त राहू लागली.अशातच आरोपी आशिष बारतीने व युवतीची मैत्री झाली.मैत्रीचे रुपांतर प्रेमात होताच अनेकदा शारीरिक आकर्षण झाले.प्रेम बहरून येताच याची कानकुन युवतीच्या आईला झाली.त्यामुळे आईने तंटामुक्त गाव समितीकडे तोडगा काढण्यासाठी तक्रार दिली.तंटामुक्त गाव समितीने प्रकरण अंगलट येऊ शकते,म्हणताच आरोपी तरुणाने युवतीशी एका महिन्यात लग्न करू,असे आश्वासन समितीला दिले. मात्र,वारंवार विचारणा करूनही आरोपी तरुणाने युवतीला प्रतिसाद देण्याचे बंद केले.त्यातच काही कलावधितच आरोपी तरुणाची बँकेत नोकरी लागली.नोकरी लागताच आरोपीने युवतिशी लग्नास ‘नो’ म्हटले.त्यामुळे पिडीत युवतीने पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.त्यानुसार आरोपी आशिष बारतीने यास भद्रावती पोलिसांनी अटक केली आहे.
- Advertisement -

