Friday, May 1, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तकृषीमंत्री म्हणतात; शेतकरी कर्ज भरत नाही; कर्ज माफ झाले तर पैशांतून साखरपुडे...

कृषीमंत्री म्हणतात; शेतकरी कर्ज भरत नाही; कर्ज माफ झाले तर पैशांतून साखरपुडे अन् लग्न करतात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील काही भागात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.त्यामुळे नुकसान झालेल्या भागातील पाहणी करण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे नाशिक दौऱ्यावर गेले होते.अशातच कोकाटेंनी शेतकरी कर्जमाफीसह अनुदान संदर्भात वादग्रस्त विधान केले आहे.वादग्रस्त वक्तव्यानंतर शेतकरी संतप्त झाले आहेत.
नाशिकमध्ये नुकसानीची पाहणी करतांना कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंनी शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या.त्यातच एका शेतकऱ्याने त्यांना कर्जमाफीबाबत थेट प्रश्न विचारला, ‘अजित पवार म्हणाले की कर्जमाफी होणार नाही मग नियमित कर्ज भरणाऱ्यांना कर्जमाफी मिळेल का?’ या प्रश्नावर कोकाटे यांनी उत्तर देतांना म्हटले की, ‘जे शेतकरी कर्ज वेळेवर फेडतात त्यांनी फेडावे पण अनेकजण पाच-दहा वर्ष फक्त कर्जमाफीची वाट बघतात.कर्ज घेतात आणि काही भरत नाहीत.आणि जेव्हा कर्जमाफी होते तेव्हा मिळालेल्या त्या पैशांचा उपयोग शेतीसाठी होतो का? एक रुपयाचीही गुंतवणूक शेतीत करता का? असा थेट सवाल त्यांनी शेतकऱ्याला केला.सरकार शेतकऱ्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विविध योजना देते,त्यामध्ये पाईपलाईन,सिंचन, शेततळे अशा योजना समाविष्ट आहेत.पण शेतकऱ्यांकडून या निधीचा उपयोग शेतीत करण्याऐवजी वैयक्तिक खर्चासाठी होतो,तुम्ही पीक विमा मागता,पण त्या पैशांतून साखरपुडे करता,लग्न करता,’ असे कोकाटे उपस्थित शेतकऱ्यांना म्हणाले.
कृषी मंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यावरून टीकेची झोड उठली आहे.शेतकऱ्यांनी म्हटले की,कोकाटे हे देखील शेतकरी कुटुंबातील असून अनुदानाच्या पैशातून आम्ही लग्न करतो की कर्ज घेऊन शेती करतो हे कोकाटे यांनी एकदा येऊन पहावे.कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचे शेतकऱ्यांबद्दलचे हे पहिलेच वादग्रस्त विधान नाही तर यापूर्वीही कृषीमंत्री कोकाटेंनी शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त विधान केले आहे.माणिकराव कोकाटे यांनी अमरावती येथे शेतकऱ्यांच्या पिकविमा संदर्भातील प्रश्नावर बोलतांना एक वादग्रस्त विधान केले होते.ते म्हणाले होते की, “भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही,पण आम्ही एक रुपयात पिकविमा दिला.” या वक्तव्यामुळे राज्यातील शेतकरी संघटनांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली होती.अशातच आता पुन्हा एकदा कोकाटे यांच्या वक्तव्यावरून शेतकऱ्यांमधून संतापाची लाट उसळली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!