Saturday, July 11, 2026
Homeचंद्रपूरनिवडणूक जिंकण्यासाठी केली भानामती; अन् स्वतःच अडकले जाळ्यात….जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत चार सुशिक्षित...

निवडणूक जिंकण्यासाठी केली भानामती; अन् स्वतःच अडकले जाळ्यात….जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत चार सुशिक्षित व्यक्तींवर गुन्हा दाखल….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

चंद्रपूर :- राजुरा शहरातील शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत बापूजी पाटील मामुलकर प्रतिष्ठानच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीपुर्वी सदर निवडणुकीत आपल्याला सत्ता मिळावी; या लालसेपोटी संस्थेतील संचालकाने आपल्या नातलग व्यक्तींना सामिल करीत अन्य संचालकांच्या घरी जाऊन सोफ्यात काळा धागा बांधून हळद, कुंकू लावून काही अवांछनीय वस्तू ठेवल्या.सदर संचालक सायंकाळी घरी गेल्यानंतर या बाबींची वाच्यता होताच व काही लपवून ठेवलेल्या वस्तू निदर्शनाला आल्याने सर्वच घाबरून गेले. उपलब्ध सीसी टीव्ही वर हा सर्व प्रकार उघडकीस आला.या अंधश्रध्देला खतपाणी देणाऱ्या प्रकाराविषयी संस्थेचे चार संचालक अविनाश जाधव, डॉ.एस.एम.वारकड,प्रा.बी.यू.बोर्डेवार आणि संचालक दत्तात्रय येगिनवार यांचा मुलगा सचिन येगीनवार यांनी राजुरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.अखेर काल सोमवारी राजुरा पोलिस स्टेशनमध्ये अपराध क्रमांक ०५९४ नुसार माजी जिल्हा परिषद सदस्य मेघा नलगे,प्रा.मयुरी नलगे,शिक्षिका शिल्पा भुते आणि अभिजित भुते यांच्यावर अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध कायदा कलम ३ (१) व ३ (२ ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.बापूजी पाटील मामुलकर प्रतिष्ठान या संस्थेतर्फे काही शाळा संचालित करण्यात येतात. या संस्थेचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने सहाय्यक धर्मदाय आयुक्त चंद्रपूर यांच्या आदेशाने दिनांक १५ आक्टोंबर २०२३ ला निवडणूक घेण्यात आली.यापूर्वी आरोपींनी या संचालकांचे घरी जाऊन सोफ्यात हळद,कुंकू व काळा दोरा बांधलेल्या वस्तू लपवून ठेवल्या.मात्र सीसीटीवीमुळे बिंग फुटले. यानंतर तक्रारदारांनी सीसीटीव्ही फुटेज,ऑडीओ रेकार्डींग व सापडलेल्या वस्तू राजुरा पोलिस ठाण्यात जमा करण्यात केल्या.अंधश्रध्देच्या आहारी जाऊन गैरप्रकार केल्याने चार सुशिक्षित व्यक्तींवर गुन्हा दाखल झाल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. सदर प्रकरणाचा तपास ठाणेदार योगेश्वर पारधी  करीत आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दोन दुचाक्या एकमेकींना धडकल्या; एकाचा घटनास्थळीच मृत्यू, तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-दोन दुचाक्या समोरासमोर एकमेकींना धडकून घडलेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा घटनास्थळावरच मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज,शनिवार ११ जुलै रोजी सायंकाळी सात...

दोन महिला उपजिल्हाधिकाऱ्यांना दणका; निलंबनासह विभागीय चौकशीचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त :-शासकीय कार्यालयात वारंवार गैरहजर राहणे,परवानगीशिवाय मुख्यालय सोडणे, आढावा बैठकांना अनुपस्थित राहणे,रजेचे अर्ज विहित नमुन्यात व वेळेत सादर न करणे,वरिष्ठांच्या आदेशांची अवहेलना...

देसाईगंजच्या विहीरगाव(पोटगाव)येथील ‘त्या’ मातेने रुग्णवाहिकेतच दिला गोंडस मुलीला जन्म..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या विहीरगाव(पोटगाव)येथील रहिवासी स्वाती चांगदेव नेवारे ह्या माहेरी बाळंतपणासाठी गेल्या असता  आरोग्य केंद्रातून रुग्णवाहिकेद्वारे गोंदियाला रेफर करत असतांनाच काही अंतरावरील मार्गावर...

कुरुडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रास आरोग्य सेवेचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालकांची भेट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे शासन स्तरावर प्रलंबित असलेले प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्यात येतील,अशी ग्वाही आरोग्य सेवेचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!