Monday, July 13, 2026
Homeचंद्रपूरनशिली पदार्थाची विक्री करणार,तितक्यातच धडकले पोलीस; लाखो रुपयांच्या मुद्देमालासह एकास अटक..

नशिली पदार्थाची विक्री करणार,तितक्यातच धडकले पोलीस; लाखो रुपयांच्या मुद्देमालासह एकास अटक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-नशेच्या दुनियेत बेधुंद करण्यासाठी
ड्रग्सचा बेकायदेशीररीत्या वापर करून त्याची विक्री करू पाहणाऱ्या एका ३६ वर्षीय आरोपीच्या चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या(एलसीबी)पथकाने आज,शुक्रवार २० मार्च रोजी मुसक्या आवळून तब्बल ३ लाख ५५ हजार रुपयांच्या मुद्देमालासह ५५.०९ ग्रॅम ड्रग्ज पावडर जप्त केला आहे.सदरची कारवाई ही चंद्रपूर शहराच्या रामाळा तलाव मार्गावरील महानगर पालिका खुले गार्डन परिसरात करण्यात आली.माधव नारायण मामीड वय ३६ वर्षे,रा.सपना टॉकीज मागे,जलनगर वार्ड,चंद्रपूर असे अटकेतील आरोपीचे नाव असून त्याच्यावर चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, १९८५ (एनडीपीएस ॲक्ट)अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास आरोपी माधव मामीड हा रामाळा तलाव रोड परिसरात मेफेड्रोन(एमडी) ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.या माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले व त्याची झडती घेतली असता ५५.०९ ग्रॅम मेफेड्रोन(एमडी) पावडर तसेच एमएच ३४ बीएन ४८६१ क्रमांकाची सिल्वर रंगाची जुनी ज्युपिटर कंपनीची मोपेड चारचाकी वाहन असा एकूण ३ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर कारवाई चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पीएसआय विनोद भुरले,सुनिल गौरकार तसेच पोलीस कर्मचारी सुभाष गोहोकार,सतीश अवथरे,दीपक डोंगरे, इम्रान खान,सचिन गुरनुले,हिरालाल गुप्ता,किशोर वाकाटे,शशांक बदामवार,अजीत शेंडे यांच्यासह पथकाने केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

यालाच म्हणतात खरे राजकारण..! स्थानिक आमदारांची चुप्पी; तर बाहेरच्या आमदारांना चिंता..

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-काही कालावधीपासून राज्याच्या विविध भागात अवैध रेती उत्खनन आणि रेती तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.रेतीतून मिळणारा बक्कळ पैसा अनेकांना करोडपती,तर काहींना रोडपती...

तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त; दोन आरोपींना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीत नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त करून दोन आरोपींच्या मुसक्या...

सिंदेवाहीत माकडांची दहशत कायम; दोन दिवसांत दोन जणांवर हल्ले,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही शहरात माकडांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच चालला असून दोन दिवसांत दोन नागरिकांवर हल्ले झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे वनविभागाने...

राज्यात ‘किलकारी’ उपक्रमात वर्धा पहिल्या,चंद्रपूर दुसऱ्या,वाशीम तिसऱ्या तर गडचिरोली चौथ्या स्थानावर..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत गरोदर माता,माता आणि बालकांच्या आरोग्याविषयी डिजिटल साक्षरता व जनजागृती करणाऱ्या ‘किलकारी’(Kilkari Mobile Audio Services)उपक्रमात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!