Sunday, October 25, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तभोंदूबाबा प्रकरण भोवले; अखेर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांना द्यावा लागला राजीनामा..

भोंदूबाबा प्रकरण भोवले; अखेर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांना द्यावा लागला राजीनामा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील महिलांना न्याय मिळवण्यासाठी मुंबईत चकरा माराव्या लागू नयेत, स्थानिक पातळीवरच त्यांच्या तक्रारींचा जागेवर निपटारा व्हावा,या उद्देशाने ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राज्यातील विविध जिल्ह्यात जाऊन सुनावण्या घेत राज्यभरात आतापर्यंत ५ हजार प्रकरणे जनसुनावणीच्या माध्यमातून निकाली काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले होते.अशातच नुकतेच नाशिकमधील अशोक खरात नामक भोंदूबाबाचे महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे प्रकरण उजेडात आल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे.विशेष म्हणजे,राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा अशोक खरातचे पाय धुवून पूजा करतांनाचा व्हिडिओ आणि त्याच्यासोबतचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.या गंभीर प्रकारामुळे प्रकरणाला मोठे राजकीय वळण लागून चाकणकर यांच्यावर टीकेची झोड उठली होती. महिलांच्या हक्कांचे रक्षण करणाऱ्या घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीचे अशा वादग्रस्त भोंदूबाबाशी असलेले अतिशय घनिष्ट संबंध पाहून सर्वच स्तरांतून संताप व्यक्त केला जात आहे.केवळ वैयक्तिक संबंधच नव्हे,तर रुपाली चाकणकर या अशोक खरातने स्थापन केलेल्या ट्रस्टच्या संचालिका असल्याचेही उघड झाले आहे.विशेष म्हणजे, गेल्या वर्षी एका महिलेच्या लैंगिक छळ प्रकरणात पीडितेला मदत करण्याऐवजी चाकणकर यांनी उलट खरातलाच साथ दिल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.त्यातच,विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची आग्रही मागणी लावून धरली होती. त्यानुसार,आज, शुक्रवार २० मार्च रोजी रुपाली चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याचे समोर आले आहे.वैयक्तिक कारणाने राजीनामा देत असल्याचे चाकणकर यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाच्या हल्ल्यात अंगणवाडी शिक्षिकेचा मृत्यू; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यात वाघाची दहशत पसरल्याचे दिसून येत आहे. काल शनिवारच्या सायंकाळी सिंदेवाही शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या पळसगाव जाट...

बापरे..! भाडेकरूच्या खोलीत आढळल्या लाखोंच्या बनावट नोटा..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.चक्क भाडेकरूच्या खोलीत लाखोंच्या बनावट नोटा आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ...

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या पळसगाव जाट येथील शेतशिवारात वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल शनिवारच्या सायंकाळी...

आज चंद्राच्या लख्ख प्रकाशाची अनुभूती देणारी कोजागरी पौर्णिमा..

उद्रेक न्युज वृत्त :-धार्मिक श्रद्धा,कौटुंबिक स्नेह आणि सांस्कृतिक परंपरांचा संगम असलेल्या शरद ऋतूच्या प्रसन्न वातावरणात चंद्राच्या लख्ख प्रकाशाची अनुभूती देणारी कोजागरी पौर्णिमा आज,रविवार २५...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!