Saturday, August 29, 2026
Homeचंद्रपूरनवस फेडण्यासाठी सातबहिणींच्या डोंगरावर गेलेल्या कुटुंबियांवर मधमाश्यांचा हल्ला..!

नवस फेडण्यासाठी सातबहिणींच्या डोंगरावर गेलेल्या कुटुंबियांवर मधमाश्यांचा हल्ला..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील प्रसिद्ध  सातबहिणींच्या डोंगरावर मुलीचा नवस फेडण्यासाठी गेलेल्या कुटुंबियांवर अचानकपणे मधमाश्यांनी हल्ला चढवून गंभीर जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे.यात ३ वर्षीय चिमुकली सायली चाचरकर,पुजारी विठ्ठल चाचरकर वय ५५ वर्षे,नत्थू चाचरकर वय ६२ वर्षे व कविता चाचरकर वय ५२ वर्षे अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
चाचरकर कुटुंबातील काही सदस्य सातबहिणींच्या डोंगावर आपल्या मुलीचा नवस फेडण्यासाठी गेले होते. त्यांनी पूजा सुरू केली असतांनाच अचानक मधमाश्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला.यामुळे पूजास्थळी एकच धावपळ उडाली.सर्वजण जीवाच्या आकांताने वाट मिळेल तिकडे पळत सुटले.मात्र,मधमाशांच्या हल्ल्यात चारजण गंभीर जखमी झाले.घटनेची माहिती मिळताच तळोधी पोलिस ठाण्याचे ठाणेदार व वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.बचावकार्य राबवून सर्वांना तातडीने गोविंदपूर व तळोधी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असून घटनेने भाविकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळेत राखी मेकिंग स्पर्धा व रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न.. -विद्यार्थ्यांनी देसाईगंज पोलिस बांधवांना राखी बांधून व्यक्त केली...

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या 'पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनी वडसा' येथे आज,शनिवार २९ ऑगस्ट रोजी 'एक राखी देशाचे...

पोलीस दलात खळबळजनक घटना..! पोलीस उपनिरीक्षकाने धावत्या रेल्वे समोर घेतली उडी; घटनास्थळीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच १६ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क व अर्ज शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय)यांनी शासकीय निवासस्थानी गळफास...

देसाईगंज तालुक्यात रोजगार हमीच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार.. – काम न करताच उचलली लाखो रुपयांची बिले..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यात यंत्रणा स्तरावरून करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये मोठा कथित भ्रष्टाचार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.यात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या...

सर्व अन्न विक्रेते व्यावसायिकांना परवाना घेणे बंधनकारक.. – पाणीपुरी पासून ते चहा विक्रेते व इतर परवाना नसणाऱ्यांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-अन्न व्यावसायिक विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम ३१ अंतर्गत परवाना घेणे किंवा नोंदणी प्रमाणपत्र घेणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!